पाचोरा – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गो.से.हायस्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत जिल्हास्तरीय शाळा मूल्यांकन समितीने भेट देत जिल्ह्यातील सुंदर शाळा म्हणून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे. या समितीच्या प्रमुख डायेट अधिष्ठाता प्रतिभा भावसार,सुषमा इंगळे,सरोज गायकवाड, सीमा पाटील यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या विविध विभागांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
१४ सप्टेंबर रोजी झालेल्या या भेटीत समितीने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधून तसेच शाळेतील विविध विभागांना भेटी देऊन आपला निर्णय जाहीर केला. शाळेतील विद्यार्थी सुरक्षा समिती,सखी सावित्री समिती, विद्यार्थी तक्रारपेटी, ऑटोमॅटिक हँडवॉश, सॅनेटरी नॅपकिन वेडिग मशीन व विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण उपाय योजना याबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत, अध्ययन निष्पत्ती,विद्यालयातील स्वच्छता,परसबाग, क्रीडांगण,व्यायाम शाळा व क्रीडा साहित्य विभाग, दिव्यांगासाठी स्वच्छतागृह, रंगमंच, विज्ञान /गणित प्रयोगशाळा तसेच ग्रंथालय,ई लर्निंग रूम, संगणक कक्ष, चित्रकला गृह, संगीत विभाग,तांत्रिक विभाग,किमान कौशल्य विभाग,इको क्लब,आनंददायी शनिवार, विविध परीक्षा यासह सर्व माहिती तपासून समाधान व्यक्त केले. शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून शाळेचे अभिनंदन केले जात आहे.
संस्था करणार शिक्षकांना सन्मानित
गुणवत्ता आणि विद्यार्थी केंद्रस्थानी मानून श्री. गो.से. हायस्कूलने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड.महेश देशमुख,व्हाईस चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांचे सह सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ अभिनंदन केले असून संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी दिली आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377