महाराष्ट्र शासनाकडील माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पाचोरा नगरपरिषदेचा नगर परिषद व नगरपंचायत गटात हाय जंप (मागील वर्षाच्या तुलनेत उत्तम कामगिरी) या प्रकारात नाशिक विभागात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. यामुळे पाचोरा नगरपालिकेस 50 लक्ष रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले.
१ एप्रिल २०२३ ते १ मे २०२४ या काळात माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व २२२१८ ग्रामपंचायती अशा २२,६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये नगरपरिषद ५० हजार ते एक लाख लोकसंख्या गटात हाय जंप प्रकारात नाशिक विभागात पाचोरा परिषदेस विभागात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
यापूर्वी नगरपरिषदेचा क्रमांक तळामध्ये होता. त्यानंतर नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी सदर अभियानामध्ये लक्ष देऊन, जल-वायु-अग्नि-पृथ्वी-आकाश या घटकामध्ये उत्तम कामगिरी बजावली व नगरपरिषदेचा क्रमांक वरचा कसा येईल, या दृष्टीने प्रयत्न केले. त्यानंतर आलेल्या मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांनी सुद्धा सदर अभियानाच्या कामामध्ये सातत्य ठेवून कामकाज केल्यामुळे पाचोरा नगरपरिषदेस हाय जंप प्रकारात नाशिक विभागात दूसरा क्रमांक प्राप्त करता आला. यासाठी पाचोरा नगरपरिषदेचे विभाग प्रमुख जितेंद्र मोरे, तुषार नकवाल, विरेन्द्र घारु तसेच शहर समन्वयक रविंद्र पवार यांची भूमिका मोलाची ठरली असे मत व्यक्त केले. तसेच नागरिकांनी सुद्धा सदर मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी होऊन नगरपरिषदेस सहकारी करावे अशी भावना मुख्याधिकारी यांनी व्यक्त केली. तसेच माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये पाचोरा नगरपरिषदेचा राज्यात क्रमांक आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याबाबत व तसे नियोजन करण्यात येणार असल्याबाबत मुख्याधिकारी यांनी माहिती दिली.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377