जळगाव मध्ये 3 ऑक्टोबर रोजी ‘उद्यमात सकल समृध्दी- महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव दि.- राज्यात मागील दोन वर्षाच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने विविध योजना राबवुन केलेल्या विकास कामामुळे महाराष्ट्र शासनाची आर्थिक प्रगतीची वाटचाल जोमाने सुरु आहे. शासनाने लोक कल्याणाभिमुख विविध योजना राबवुन त्यांचा जनतेस झालेला लाभ व भविष्यात राबविण्यात येणा-या योजना जळगाव विभागातील जनतेस माहिती व्हाव्यात या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन,उद्योगमंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा. स्मिताताई वाघ, विधान परिषदेचे आमदार सर्वश्री आ.एकनाथ खडसे, आ.किशोर दराडे,आ.सत्यजित तांबे, विधानसभा आमदार सर्वश्री आ.चिमणराव पाटील, आ. संजय सावकारे,आ. शिरीष चौधरी, आ.सुरेश दामु भोळे (राजु मामा), आ. किशोर पाटील, आ.लताताई सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.मंगेश चव्हाण, हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह महाबळ जळगांव येथे गुरुवार, ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी 2 वाजता ‘उद्यमात सकल समृध्दी- महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, जळगाव या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमास उद्योग विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून जळगांव विभागातील उद्योजक, डॉक्टर, वकील, विद्यार्थी, बांधकाम व्यावसायिक, सी.ए., पर्यटन व्यावसायिक व शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी यांना निमंत्रित करण्यात आले आहे
तसेच, सदर कार्यक्रमाकरीता अंदाजे २२०० ते २५०० एवढा जनसमुदाय जमण्याची शक्यता आहे. तरी जळगांव शहर व ग्रामीण भागातून उपस्थित राहणारे सर्व नागरिक यांना आवाहन करण्यात येते कि, नमुद कार्यक्रमाचे ठिकाणी पार्किंगची व्यवस्था छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ, जळगांव लगत उत्तर बाजुला करण्यात आलेली आहे. तसेच कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळीच उद्योगमंत्री यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचेही एम. आय.डी.सी कडून सांगण्यात आले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



