नंदुरबारमध्ये दारू व्यापाऱ्याच्या आस्थापनेवर आयकर विभागाचा सर्वे; ५५ लाखांचा टीसीएस तातडीने वसूल

जळगाव, दि. 14 — नाशिक व जळगाव येथील आयकर विभागाच्या टी.डी.एस. पथकाने संयुक्त आयकर आयुक्त (टी.डी.एस.) रेंज, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच नंदुरबार येथील दारू व्यापार करणाऱ्या एका आस्थापनेच्या कार्यालयात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणादरम्यान दिवसभर विविध कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली.
तपासणीत या आस्थापनेने चालू आर्थिक वर्षात सुमारे ५५ कोटी रुपयांची दारू विक्री केल्याचे निदर्शनास आले. मात्र या विक्रीवर आकारणीयोग्य १ टक्का टी.सी.एस. (५५ लाख रुपये) शासकीय तिजोरीत जमा न केल्याचे आढळून आले. यामुळे आयकर विभागाच्या टी.डी.एस. अधिकाऱ्यांनी संबंधित आस्थापनेची सखोल चौकशी केली.
कारवाईदरम्यान संबंधित व्यापाऱ्याकडून तातडीने ५५ लाख रुपये शासकीय तिजोरीत भरणा करून घेण्यात आला असून, मागील थकबाकीपोटी ५० लाख रुपये भरण्यासाठी व्यापाऱ्याने १५ दिवसांची मुदत मागितली आहे.
दरम्यान, आयकर विभागाने सर्व संबंधित व्यापारी व आस्थापनांना आयकर कायदा, १९६१ अंतर्गत टी.डी.एस. व टी.सी.एस.च्या सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन मनु भारद्वाज आयकर अधिकारी टी.डी.एस जळगाव यांनी प्रसिद्धपत्रकान्ये केली आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



