आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयाच्या पुरग्रस्त विद्यार्थ्यांना जळगाव येथील मू. जे. महाविद्यालयाकडून मदतीचा हात


पाचोरा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित व जळगाव येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या दातृत्वातून पाचोरा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात महापुरात शैक्षणिक नुकसान झालेल्या महाविद्यालयातील 162 पूरग्रस्त विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय दप्तर, वह्या व पेन संस्थेचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजयजी वाघ, व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक मा. श्री. आप्पासाहेब सतीश चौधरी, ज्येष्ठ संचालक मा. श्री. दादासाहेब डॉ. जयंतराव पाटील, जळगाव येथील मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. देवेंद्र इंगळे, मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता व इंग्रजी विभागप्रमुख मा. प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर, मा. प्रा. डॉ. जुगलकिशोर दुबे, मा. प्रा. डॉ. विजय लोहार, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष बी. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले व उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आले. त्यासोबत या महाविद्यालयाकडून पाचोरा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाला विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी UPSC/MPSC सामान्यज्ञान मार्गदर्शनाची 20 मोठी पुस्तकेही भेट देण्यात आली. त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजयजी वाघ यांनी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. दादासाहेब एन. जी. बेंडाळे आणि मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. एस. एन. भारंबे व महाविद्यालय परिवाराचे अभिनंदन, कौतुक व आभार मानले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून त्यांनी विद्यार्थ्यांना खचून न जाता नवीन प्रेरणा घेऊन जिद्दीने अभ्यास करून अधिकारी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाकडून मा. प्रा. डॉ. भूपेंद्र केसूर यांनी विद्यार्थ्यांना अश्या संधीचे सोने करून अभ्यास व जिद्दीच्या प्रयत्नातून पुढे मार्गक्रमण करावे असा संदेश दिला.
यावेळी प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा. आर. बी. वळवी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप रुद्रसवाड, प्रा. अमित गायकवाड, प्रा. जयश्री वाघ, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. लक्ष्मी गलाणी, प्रा. किरण पाटील, प्रा. सुनीता तडवी, प्रा. अक्षय तडवी, प्रा. जयश्री महाजन, श्री. बी. जे. पवार, श्री. सुरेंद्र तांबे, श्री. जयेश कुमावत, श्री. नदीम देशमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व पूरग्रस्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील, यादी वाचन डॉ. माणिक पाटील, सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले तर आभार डॉ. क्रांती सोनवणे केले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!