तरुणांनी केला वारकरी संप्रदायाची माळ घालून निर्व्यसनी राहण्याचा संकल्प

पाचोरा – पाचोरा शहरात अलीकडे धकाधकीच्या जीवनामध्ये एक गोड बातमी सगळ्यांकडे येत आहे ती म्हणजे तरुणांचा वारकरी संप्रदायाकडे वाढणारा कौल तरुण म्हटलं की त्याच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो तो म्हणजे बिघडलेला कोणाचेही न ऐकणारा स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करणारा आणि अशा स्थितीत तरुणांनाही वाटतं की हा समाज आपल्याला समजून घेत नाही आणि मग त्यांचा कल वाढतो तो व्यसनाकडे जाण्याचा आणि मग व्यसनाधीन होऊ लागतात आणि व्यसनाधीन झालेल्या तरुणाला समाजात सन्मान मिळत नाही किंवा इतर घटक सुद्धा त्याला सन्मान देत नाहीत आणि मग परिणामतः तो तरुण संपूर्णपणे खचतो अशा स्थितीमध्ये त्या तरुणांना आधार मिळावा आणि ते योग्य दिशेला जावे हा विचार करून शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था चे योगेश महाराज यांनी एक संकल्प घेतला तो म्हणजे 1008 तरुण व्यसनमुक्त माळकरी करणे आणि त्याला प्रथमता सहकार्य लागले ते म्हणजे शहरातील पाचोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय योगेश गणगे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने शहरातील भोला पाटील हे माळकरी झाले व त्याचा इंस्टाग्राम चा रिल व्हायरल झाल्यानंतर तो तरुणांपर्यंत पोहोचला व त्यानंतर तरुणांनी सुद्धा आपण माळकरी बाबा हा संकल्प केला व ते महाराजांकडे वारकरी भवन वर येऊ लागले व त्या माध्यमातून जवळजवळ एका महिन्यात 278 तरुण मुले माळकरी झाले त्यात परिसरातील पुनगाव मोंढाळे खडकदेवडा व अंतुरली खुर्द व बुद्रुक दोघ गावातून शेकडो तरुण माळकरी झाले त्यात छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष भूषण पाटील व समूहातील सर्व सदस्य यांनी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला
अनेक तरुण या अनुषंगाने सांप्रदायाकडे व शुद्ध आचरणाकडे वळत आहेत व त्या मुलांचे येणारे अनुभव महाराजांकडे येऊन सांगत आहेत तसेच महाराजांच्या धर्मपत्नी सौ सुनीताताई पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक तरुणी माळकरी होत आहेत महाराजांनी सर्वांना आवाहन केले आहे की अधिकाधिक तरुणांनी माळकरी होऊन आपल्या जीवनामध्ये व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करायचा आहे व निरोगी आयुष्य जगून मांसहाराचा त्याग करावा असा सर्व संदेश महाराज सर्व मुलांना देत असतात.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



