दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

पाचोरा येथे वरिष्ठ न्यायालयाची मागणी! कृती समिती गठीत!
पाचोरा दि.31 – येथील दी पाचोरा लॉयर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पाचोरा न्यायालयातील मुख्य वकील कक्षात दुपारी 2:00 वाजता संपन्न झाली. सभेचे अध्यक्षस्थानी दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. रवींद्र अशोक ब्राह्मणे हे होते तर प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.अण्णासाहेब भोईटे, ज्येष्ठ सदस्य ॲड .बापू सैंदाणे हे होते. यावेळी असोसिएशनचे सचिव ॲड .सुनील सोनवणे यांनी सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. यावेळी पाचोरा न्यायालयात सिनियर डिव्हिजन कोर्ट होणे बाबत चर्चा करण्यात आली व महाराष्ट्र शासन तसेच मुंबई उच्च न्यायालय ,औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी कार्यवाही करणे बाबत समिती गठीत करण्यात आली व समितीच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देणे बाबत विचार विनिमय करण्यात आला.
येणाऱ्या काळात पाचोरा येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व फौजदारी न्यायालय झालेच पाहिजे अशी भूमिका दी पाचोरा लायर्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली व त्याबाबत येणाऱ्या काळात सनदशीर मार्गाने लढा देण्याचे ठरले.
सभासद हिताची चर्चा करण्यात आली व सभासदांचा विमा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी असोसिएशनचे सचिव ॲड.सुनील सोनवणे, सहसचिव ॲड. अंकुश कटारे, विश्वस्त ॲड ज्ञानेश्वर लोहार ,ॲड.बबलू पठाण, ॲड. करुणाकर ब्राह्मणे,ॲड अमजद पठाण , ॲड. मंगेश गायकवाड , ॲड.लक्ष्मीकांत परदेशी, ॲड. सागर सावळे , ॲड. प्रशांत मालखेडे ,ॲड. कैलास सोनवणे हे हजार होते.
सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. उपस्थितांचे आभार सचिव सुनील सोनवणे यांनी मानले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



