
पाचोरा- गुन्हे शोध पथक यांनी अवघ्या ४ तासात आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयात चोरी झालेली मोटार सायकल हस्तगत करुन सदर गुन्हयाचे दोषारोपपत्र १२ तासाचे आत मा. पाचोरा न्यायालयात दाखल केले आहे. फिर्यादी प्रशांत शंकर वाघ, वय ४२ वर्षे, धंदा. शेती, रा. सातगांव डोंगरी, ता. पाचोरा, जि. जळगांव यांनी दिनांक १०/०३/२०२६ रोजी २०.३७ वा. चे सुमारास राधाकृष्ण पेट्रोलपंप, जामनेर रोड, पाचोरा, जि. जळगांव येथे त्यांची हिरो कंपनीची फॅशन प्रो लाल रंगाची मो.सा. क्र. MH-19 BR-4211 ही पार्क करुन ठेवली असता ती आरोपी तुषार लक्ष्मण आघाडे, रा. सातगांव डोंगरी, ता. पाचोरा, जि. जळगांव याने चोरी केले बाबत पाचोरा पोलीस ठाणे गु. रजि. क्रमांक ११९/२०२६, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक १४/०३/२०२६ रोजी १३.५६ वा. गुन्हा दाखल आहे. दिनांक १४/०३/२०२६ रोजी सदर गुन्हयाचे अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ / ०६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ / १४२२ शरद मांगी पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने भारत डेअरी बसस्टॉप, पाचोरा येथे एक इसम हा त्याचे ताब्यातील मोटार सायकल सह संशयीतरित्या परीसराची टेहळणी करीत असल्याची बातमी मिळताच भारत डेअरी, बसस्टॉप, पाचोरा येथे जावुन सदर इसमाचे ताब्यात गुन्हयात चोरी झालेली वरील मोटार सायकल ही मिळुन आल्याने त्यास पाचोरा पोलीस ठाणे येथे आणुन त्यास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी त्यास त्याचे नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव तुषार लक्ष्मण आघाडे, वय २७ वर्षे, रा. सातगांव डोंगरी, ता. पाचोरा, जि. जळगांव असे सांगीतल्याने त्याने वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन पंचासमक्ष त्याचे कब्जातील गुन्हयात चोरी झालेली १५,०००/- रुपये किंमतीची हिरो कंपनीची फॅशन प्रो लाल रंगाची मो.सा. क्र. MH – 19 BR-4211 ही जप्ती पंचनामा करुन जप्त केली आहे.
सदर गुन्हयाचे दोषारोपपत्र १२ तासाचे आत मा. पाचोरा न्यायालयात दाखल केले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / ०६२५ राहुल काशिनाथ शिंपी यांनी केला आहे.सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. बापु रोहम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, पोहेकॉ / ६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ / १४२२ शरद मांगो पाटील यांनी पार पाडली आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



