आसनखेडे येथे वास्तुशांती सोहळ्यानिमित्त स्तुत्य उपक्रम; स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे मोफत वाटप

पाचोरा(आसनखेडे) – आजच्या धावपळीच्या युगात सण-उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करण्याकडे सर्वांचा कल असतो. मात्र, आसनखेडे (ता. पाचोरा) येथील श्री सचिन बोरसे यांच्या संकल्पेनेतून बोरसे परिवाराने आपल्या नवीनस्तूच्या वास्तुशांती सोहळ्याचे औचित्य साधून एक नवा आदर्श समाजा समोर ठेवला आहे. ‘युवा पिढीच्या स्वप्नांना लाभो यशाचा हात’ हे ब्रीद समोर ठेवून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले.ज्ञानदान उपक्रमातून सामाजिक बांधिलकी कै. दिगंबर सदाशिव पाटील (आसनखेडे) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि आशीर्वादाने आयोजित या ‘वास्तुशांती सोहळा व ज्ञानदान उपक्रमात’ शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नवीन घराच्या आनंदात केवळ मेजवानी न देता, ज्ञानाची साथ देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी हा मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.या उपक्रमासाठी श्री. पांडुरंग दिगंबर पाटील, श्री. लखाजी दिगंबर पाटील, श्री. रंगनाथ दिगंबर पाटील, श्री. हंसराज पांडुरंग पाटील, श्री. प्रेमराज पांडुरंग पाटील, श्री. राजेंद्र विश्वनाथ पाटील, श्री. सचिन जगन्नाथ बोरसे, श्री. प्रशांत रघुनाथ पाटील, श्री. मनोज लखाजी पाटील, श्री. श्रीपाद रघुनाथ पाटील, श्री. अर्जुन रंगनाथ पाटील आणि समस्त आसनखेडेकर बोरसे परिवाराने विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ अनिल पाटील यांनी केले,शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



