पाचोर्यातील बोगस जीएसटी धारकावर कारवाईची मागणी.

पाचोरा- पाचोर्यातील मध्यवर्ती भागामध्ये राम सेल्स नावाने भव्य शोरुम आणि जीएसटी नंबर 27AFPPC 2836Q1ZV हे राम गुरुमुगदास चंदवानी यांच्या नावाने गेल्या 2017 पासून नियमित चालू आहे. आणि दि.20/09/2023 रोजी सदर चंदवाणी यांनी गेल्या 10-15 वर्षापासून कुटुंबासह दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करत असल्याबाबत मा. तहसीलदार पाचोरा यांच्याकडून शेतमजूर असल्याचा दाखला घेतला आहे. शेतमजुरी करणारा व्यक्ती व्यवसायिक जीएसटी धारक राहू शकत नाही आणि सदर जीएसटी व राम सेल्स दुकानाशी राम गुरुमुगदास चंदवानी यांचा काही एक संबंध नाही किंवा हिस्साही नाही असे मा. तहसिलदार सो पाचोरा विजय बनसोडे साहेब पाचोरा यांच्या समोर दिनांक 12/03/2026 रोजी चंदवानी यांनी खुलासा सादर केला आहे.
यावरून रिपब्लिकन सेना पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल बागुल यांचे म्हणणे आहे की, राम गुरुमुगदास चांदवानी हे जर शेतमजूर आहे तर मग यांच्या नावाने 2017 पासून जीएसटी व भव्य शोरूम कुणाचे सदर जीएसटी वरून पाचोरा शहरांमध्ये गैर कृत्याचा प्रकार चालू असू शकतो आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही करिता सदर जीएसटी धारकाला शोधून त्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंद करण्यात यावे असे निवेदन पाचोरा तहसील चे नायब तहसीलदार मा . श्रीमती प्रतिभा राजपूत यांना देण्यात आले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



