व्हॉट्स ऍप द्वारे बनावट प्रोफाईल तयार करुन जिल्हा परिषदेशी सबंधितांना संशयास्पद मेसेज
जळगांव :- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . अंकित यांचे नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ९४७८२५६००६० या मोबाईल क्रमांकारावरून व्हॉट्स ऍप द्वारे बनावट प्रोफाईल तयार करुन जिल्हा परिषदेशी सबंधित अधिकारी व कर्मचारी याना संशयास्पद मेसेज करत असलेचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारचे मेसेज करुन कोणाचीही दिशाभूल करण्याचा प्रकार झाल्यास तात्काळ संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल करावी व अशा मेसेजची दखल घेऊ नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी केले आहे.
जळगांव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांचे नावाचा व छायाचित्राचा वापर करून अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने बनावट प्रोफाईल तयार केले असून ९४७८२५६००६० या क्रमांकावरून जिल्हा परिषदेशी सलग्नीत काही अधिकारी व कर्मचारी याना संशयास्पद मेसेजेस प्राप्त झाले आहेत. संबंधित व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .अंकित असल्याचे दाखवत आहे.या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारी यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन सबंधिताच्या कोणत्याही मेसेज ला बळी न पडता असा प्रकार निदर्शनास येताच त्या अज्ञात मोबाईल धारकास कोणताही प्रतिसाद न देता तक्रार करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377