
जळगाव दि. 31 – महाराष्ट्र शासनाने राज्यातील खेळाडूंसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या १२ क्रीडा प्रकारांसाठी कार्यरत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
राज्यातील अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती या खेळांमध्ये उत्कृष्ट खेळाडू घडवणाऱ्या अकादमींचे सक्षमीकरण करण्यासाठी या योजनेत संस्थांचे गुणवत्तेनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे.
वर्गीकरण व आर्थिक सहाय्य:
अ वर्ग (७६-१०० गुण): वार्षिक रु. ३० लाख
ब वर्ग (५१-७५ गुण): वार्षिक रु. २० लाख
क वर्ग (३५-५० गुण): वार्षिक रु. १० लाख
हे अनुदान क्रीडा सुविधांच्या उभारणीसाठी, प्रशिक्षकांच्या मानधनासाठी, तसेच क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.
यासाठी अर्ज कुठे करावा?
इच्छुक संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज व आवश्यक माहिती प्राप्त करावी, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा सहसंचालक श्री. सुधीर मोरे यांनी केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



