पाचोरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील वरखेडी नाका येथे नाकाबंदी दरम्यान लाखोंचा गुटखा पकडला

पाचोरा – दिनांक ०१/०४/२०२५ रोजी २१.०० वा. वरखेडी नाका, पाचोरा येथे नाकाबंदी साठी सपोनि / श्री. दिनेश भदाणे, पोहेकॉ / ०६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ / २४०३ समीर बापुराव पाटील, पोकॉ / १२७६ सुनिल आनंदा पाटील असे ०१.०० वा. ते ०४.०० वा. पावेतो नाकाबंदी करीत असतांना जामनेर रोड कडुन पाचोरा रोड कडे एक वाहन येतांना दिसले. सदर वाहनावर पोलीसांना संशय आल्याने त्यांस थांबण्याचा इशारा केला असता वाहनावरील चालक हा त्याचे वाहन पळवुन घेवु लागला. त्यास ०३.१५ वा. चे सुमारास थांबवुन सदर वाहन चालकास त्याचे नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव दत्तु लालदास बैरागी, वय ३१ वर्षे, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगांव, जि. जळगांव असे सांगीतले. सदर चालकास त्याची अशोक लेलंड कंपनीचे दोस्त प्लस मॉडेल असलेले क्रिम रंगाची गाडी क्रमांक एम.एच. – ५२, ००३४ यामध्ये काय माल आहे याबाबत विचारणा करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलीसांना सदर गाडीचा संशय आल्याने त्यांनी. सदर गाडीचे पाठीमागे जावुन बघीतले असता सदर गाडीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसाला व तंबाखु असल्याचे आढळुन आले. तात्काळ पंचाना बोलावुन पंचाचे उपस्थितीत सदर वाहन चालक व त्याचे ताब्यातील गाडी व त्यामधिल गुटखा हा पाचोरा पोलीस ठाणे येथे आणला. त्यामध्ये खालील वर्णनाचा माल आढळुन आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे,
१) ९,४०,००० /- रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे २० पोते एका पोत्यामध्ये ५ लहान पांढरी गोणी, एका गोणीत ४ गठठे, एका गठयामध्ये विमल पान मसाला केसरयुक्त असे लिहीलेले हिरव्या रंगाचे ५ पाऊच, असे एकुण २,००० पाऊच, एका पाऊचची किंमत ४७० /- रुपये प्रमाणे,
२) ३,०४,९२०/- रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे ०७ पोते, एका पोत्यामध्ये १० लहान पांढरी गोणी, एका गोणीत विमल पान मसाला केसरयुक्त असे लिहीलेले निळया रंगाचे २२ पाऊच, असे एकुण
१,५४० पाऊच, एका पाऊचची किंमत १९८/- रुपये प्रमाणे,
३) ७,७७,९२०/- रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे २० पोते एका पोत्यामध्ये ४ लहान पांढरी गोणी, एका गोणीत विमल पान मसाला केसरयुक्त असे लिहीलेले हिरव्या रंगाचे ५२ पाऊच, असे एकुण ४,१६० पाऊच, एका पाऊचची किंमत १८७/- रुपये प्रमाणे,
४) ६०,००० /- रुपये किंमतीचे वि-१ तम्बाकु चे २० लहान पोते, एका पोत्यामध्ये ५ लहान पांढरी गोणी, एका गोणीत २० पाऊच, असे एकुण हिरव्या रंगाचे २,००० पाऊच, त्यावर वि-१ बिग तम्बाकु असे लिहीलेले, एका पाऊचची किंमत ३० /- रुपये प्रमाणे,
५) ३३,८८० /- रुपये किंमतीचे वि-१ तम्बाकु चे ०७ लहान पोते, एका पोत्यामध्ये १० लहान पांढरी गोणी, एका गोणीत २२ पाऊच, असे एकुण जांभळया रंगाचे १,५४० पाऊच, त्यावर वि-१ तम्बाकु असे लिहीलेले, एका पाऊचची किंमत २२/- रुपये प्रमाणे,
६) १,३७,२८० /- रुपये किंमतीचे वि-१ तम्बाकु चे ०४ मोठे पोते, एका पोत्यामध्ये ०५ लहान पांढरी गोणी, एका गोणीत ०४ गठठे, एका गठयात ५२ पाऊच, असे एकुण हिरव्या रंगाचे ४,१६० पाऊच, त्यावर वि-१ तम्बाकु असे लिहीलेले, एका पाऊचची किंमत ३३/- रुपये प्रमाणे,
७) ८,००,०००/- रुपये किंमतीचे एक अशोक लेलंड कंपनीचे दोस्त प्लस मॉडेल असलेले क्रिम रंगाची गाडी क्रमांक एम.एच.-५२, ००३४ अशा वर्णनाची जु. वा. किं.सु.
३०,५४,००० /- रुपये एकुण
सदर बाबत पाचोरा पोलीस ठाणेस गु. रजि. क्रमांक १६४ / २०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम सन २००६ चे कलामान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर बाबत गाडी चालक नामे १) दत्तु लालदास बैरागी, वय ३१ वर्षे, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगांव, जि. जळगांव व मालक २) सनी टेकचंद पंजाबी, वय ३५ वर्षे, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा, जि. जळगांव यांना सदर गुन्हयात अटक करुन मा. पाचोरा न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी रिमांड मंजुर केल्याने त्यांना सब जेल, जळगांव येथे सोडण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार, सपोनि / श्री. दिनेश विलासराव भदाणे, पोउपनिरी / श्री. सोपान गोरे, पोहेकॉ / ६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ / २४०३ समीर बापुराव पाटील, पोकों / १२७६ सुनिल आनंदा पाटील यांनी पार पाडली आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



