पाचोरा येथे बास्केटबॉल ग्रुप तर्फे खुल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन.
पाचोरा – दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पासून पाचोरा येथील एस एस एम एम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय खुल्या बास्केट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी उद्घाटक पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील व अध्यक्ष स्थानी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धा ही 22 फेब्रुवारी ते 25 दरम्यान खेळली जाणार असून या स्पर्धेसाठी राज्यातील विविध नामांकित क्लब मधून,पोलीस संघ, कॉलेज संघ,तसेच प्रायव्हेट स्पॉन्सर संघ आदींनी या स्पर्धेत भाग घेतला असून या स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट खेळ पाहावयास मिळत आहे. येथील खेळाडू हे खेळात इतके पारंगत असून सामने हे अटीतटीत होताना दिसत आहे तर सदर खेळा साठी पंच हे निष्णात असून खेळाडूंनी केलेले फाऊल अचूक टिपत आहे त्यामुळे स्पर्धेतील विजयाची उत्सुकता वाढलेली दिसते.
प्रथम पारितोषक 31,000/- रक्कम व चषक असे असून ऐकून चार संघाना क्रमांका नुसार रक्कम व चषक मिळणार आहे व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूलाही चषक मिळणार आहे.
सदर स्पर्धेचे आयोजन येथील बास्केट बॉल ग्रुप तर्फे दर वर्षी होत असते.येथे खेळाडूंची राहण्याची,जेवणाची तसेच वेळे प्रसंगी वैद्यकीय व्यवस्था चोख पणे केलेली असते. शिवाय या स्पर्धा येथील दिवंगत खेळाडूंच्या स्मरणार्थ भरविली जात असते तर येथील आजी माजी खेळाडू, शिक्षक पंचक्रोशीतील दानशुर व्यक्ती, प्रायोजक असे सर्व मिळून या स्पर्धेसाठी हातभार लावत असतात.
सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजय गोहील, मार्केट कमिटी सभापती गणेश पाटील,उप.प्राचार्य वासुदेव वले, रिट.मालोजीराव भोसले, प्रदीप मराठे, डॉ स्वप्नील पाटील, डॉ समाधान वाघ, डॉ प्रमोद पाटील, चंद्रकांत धनवडे,सुनिल पाटील सर,शशी चंदीले, सुमित सावंत, वाल्मीक शाहपुरे , विनू सेठ, हेमंत चव्हाण हे होते तर
प्रमुख आयोजकान मध्ये सहकार्य पोलिस आबा पाटील , राजू पाटील, विकास पाटील. सचिन भोसले सर,गिरीश पाटील सर,मनोज सोनार,सुशांत जाधव,पो.राजू बिऱ्हाडे व ईतर सर्व ग्राउंड वरील खेळाडूंनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली असून यशस्वितेसाठी हिरहिरीने काम पाहत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377