शासकीय तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत ही गुरुकुल ने मारली बाजी
पाचोरा – जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव तर्फे आयोजित शासकीय शालेय तालुका कुस्ती स्पर्धा काल दिनांक १७/८/२४ रोजी पार पाडली.त्यात १७ वयोगट , ५७ के जी अंतर्गत फ्री स्टाईल कुस्ती या गटात पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी शर्वरी निलेश कुलकर्णी हिने तालुका क्रीडा स्पर्धेत विजय मिळवून जिल्हा क्रीडा स्पर्धेत प्रवेश करण्याचा मान मिळविला.एका पाठोपाठ एक अशा चार ही तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयाच्या शृंखला गुरुकुलच्या नावावर झालेल्या आहेत.या अविस्मरणीय यशा मुळे शाळेचे संस्थापक व प्राचार्य श्री प्रेम शामनाणी यांनी क्रीडा शिक्षक श्री निलेश कुलकर्णी ,साक्षी पवार मैडम व विजयी विद्यार्थिनी शर्वरी कुलकर्णी हीचे कौतुक करून जिल्हा पातळी वर विजया साठी शुभेच्छा दिल्या.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377