पाचोरा – महाविकास आघाडीच्या घटक पक्षात कॉग्रेस आणि उबाठा शिवसेना यांनी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहाने केला यावेळी कॉग्रेस च्या हातावर उबाठा सेनेची राखी बांधण्याचा योग आल्याने एकच चर्चा होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्षाबंधन निमित्ताने महाविकास आघाडीचे घटक पक्षांनी एकत्र येऊन रक्षाबंधन साजरे केले यावेळी शिवसेनेच्या उबाठा नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सह पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, प्रताप पाटील, इरफान मनियार, राहुल शिंदे, कल्पेश येवले, जिभाउ पाटील आदींना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
या कार्यक्रमाला शिवसेना उबाठाचे अरुण पाटील, पप्पू राजपुत, अनिल सांवत, भरत खंडेलवाल, तिलोत्तमा मौर्य, आदि उपस्थितीत होते. यावेळी कॉग्रेस आणि उबाठा शिवसेना यांनी येणाऱ्या निवडणुकीत एकमेकांना प्रामाणिक सहकार्य करण्याचे बंधन करण्यात आले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377