तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा महावीर व्यायाम शाळा व क्रीडा संस्था श्रीराम मंदिर पाचोरा येथे संपन्न

पाचोरा – दिनांक 17 ऑगस्ट दिवसांपासून सुरू असलेल्या शासकीय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा आज उत्साहात संपन्न झाल्या सदर स्पर्धा या पंचायत समिती पाचोरा व महावीर व्यायाम शाळा पाचोरा यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित करण्यात आले होते
याबाबत अधिक असे की तालुका स्तरीय सुरू असलेल्या शासकीय शालेय स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि त्यातीलच कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान हा महावीर व्यायाम शाळा पाचोरा यांना मिळाला दिनांक 17 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचे उद्घाटन राम मंदिराचे सेवक , क्रीडा समनव्यक व क्रीडा शिक्षक प्रा गिरीष पाटील श्री कैलास आमले , श्री गोविंद वाघ , सादिक शेख , श्री एकनाथ सुरवाडे , श्री धोनी सर , श्री दिनेश पाटील , श्री राजपूत सर , श्री इंद्रजित पहिलवान , श्री रवी पाटील , श्री गम्पा पहिलवान , श्री प्रवीण महाजन , श्री देविदास पहिलवान , श्री पिंटू पहिलवान , श्री राजू पहिलवान , श्री बप्पू चौधरी , श्री सुनील गुंजाळ , श्री राहुल पाटील , श्री दादू मराठे , लखन पहिलवान , सतीश पाटील , वैभव हटकर , लाला पाटील , रियाज बागवान , आदित्य आमले व इतर मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून स्पर्धेची सुरुवात केली सदर स्पर्धेत जवळजवळ 60 शाळा व महाविद्यालयातील 400 मुले व 200 मुली खेळाडूंनी सहभाग नोंदवीला.
सदर स्पर्धेत तालुक्यातील शाळांनी उत्कृष्ट प्रतिसाद नोंदविला , स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंच म्हणून श्री एस के पाटील सर , श्री दुर्गादास वानखेडे प्रा वाल्मीक पाटील श्री निलेश कुलकर्णी व इतर क्रीडा शिक्षक यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली. व संस्थेचे अध्यक्ष राजू पाटील यांच्या सहकार्याने स्पर्धा सर्व पार पडल्या . सुत्रसंचलन श्री गणेश पाटील व आभार श्री सुभाष राठोड यांनी केले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



