पाचोरा – येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत काल दिनांक 20 डिसेंबर शुक्रवार रोजी ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे कुपोषित बालकांच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 67 बालकांची तपासणी करून त्यांना औषध उपचार देण्यात आले. व त्यांच्या सकस आहाराबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. रोटरी क्लबच्या या आरोग्यविषयक उपक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी केले.
याप्रसंगी सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. किशोर पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, बालरोगतज्ञ डॉ. राहुल पटवारी, डॉ. वैशाली शिरसाठ, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. लोकेश सोनवणे, डॉ. शितल वाघ उपस्थित होते. तालुक्याच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी जिजाबाई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कुपोषित बालक तपासणी शिबिर प्रसंगी रोटरी क्लबचे सदस्य रो. चंद्रकांत लोढाया, रो. निलेश कोटेचा, डॉ. मुकेश तेली, रो. डॉ. अजयसिंग परदेशी, रो. डॉ. गोरख महाजन, रो. डॉ. अमोल जाधव, रो. प्रदीप बापू पाटील, रो. रुपेश शिंदे, डॉ. बाळकृष्ण पाटील गिरीश दुसाने तसेच ग्रामीण रुग्णालयाचे फार्मासिस्ट दगडू वाघ, श्रीकांत महाजन, कविता गायकवाड, मनीषा पवार उपस्थित होते.वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक यांनी उपस्थित पालकांना बालकांच्या आहार , विहार व व्यायाम याबद्दल मार्गदर्शन केले. तर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांचे समयोचित भाषण झाले. या शिबिराला महिला व बाल विकास प्रकल्प विभागाचे सहकार्य लाभले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377