पाचोरा- कापुस उत्पादक शेतकऱ्यांना पाचोरा बाजार समितीच्या वतीने कळविण्यात येते की, गजानन जिनिंग & प्रेसिंग फॅक्टरी पाचोरा येथे C. C. I मार्फत चालू असलेली कापुस खरेदी दि. २५/१२/२०२४ रोजी नाताळची शासकीय सुट्टी असल्यामुळे कापुस मोजमाप बंद राहणार आहे. तसेच दि. २६ व २७ डिसेंबर २०२४ रोजी हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात देखील वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दि.२८ शनिवार व २९ रविवार डिसेंबर २०२४रोजी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे तसेच दि.०२/०१/२०२५ ते ०५/०१/२०२५ पर्यंत C.C.I च्या आदेशानुसार कापूस खरेदी बंद ठेवण्यात आलेली आहे. कापुस मोजमापासाठी वाहनांची अचानक गर्दी झाल्यामुळे मोजमापासाठी लाईन मध्ये १८६ वाहने उभी आहेत. यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपला कापुस हा शेतीमाल विक्रीसाठी पुढील आदेश होईपावेतो आणू नये याची नोंद घ्यावी व बाजार समितीस सहकार्य करावे.असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी केले आहे
टिप:- खरेदी केंद्रावर उभ्या असलेल्या वाहन धारकांनी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली असल्यामुळे आपला कापुस हा शेतीमाल सुरक्षित राहील यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याची खबरदारी घ्यावी हि विंनती.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377