मतदार साक्षरता जन जागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४
मुंबई – राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन २०२४ मध्ये मतदार साक्षरता व जनजागृतीसंदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये चार वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रित (प्रिंट मीडिया), टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक), रेडिओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाइन (इंटरनेट)/सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट प्रचारासाठी पुरस्कार या चार पुरस्कारांचा समावेश आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377