वाचन विद्यार्थी जीवनाचा केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यातील ‘महावाचन उत्सव’ या उपक्रमाचे उद्घाटन
जळगाव,दि.१६ डिसेंबर – विद्यार्थ्यांसाठी वाचन हा केंद्रबिंदू असून जर वाचन केले नाही तर विद्यार्थी जीवन निरर्थक आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासन, युनिसेफ व रीड इंडिया यांच्या संयुक्त भागीदारीत ‘महावाचन उत्सव’ हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील महावाचन उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पाळधीतील स.न.झंवर विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगीडायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ. श्रीमती किरण कुवर, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, नोडल अधिकारी राहुल गायकवाड, स्थानिक पदाधिकारी मुकुंद नन्नवरे, निलेश पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, जीवनात पुस्तक वाचणे, माणसे वाचणे हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असून विद्यार्थ्यांनी वेळात वेळ काढून अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबरच जीवनाला दिशा देणाऱ्या अवांतर पुस्तकांचे देखील नियमित वाचन करावे. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत वाचन महत्त्वाचे आहे. असा मौलिक सल्ला पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला. प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले. यावेळी धरणगाव धरणगाव तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377