मलेरिया विरुदध जगाच्या संरक्षणासाठी गतीमान करुया लढा मलेरियाला हरविण्यासाठी जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल २०२४
जळगाव दि. 25 – राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांर्गत 25 एप्रिल, 2024 रोजी जागतिक हिवताप दिन संपूर्ण जिल्हा भरात साजरा करण्यात येणार आहे. डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प जळगाव तथा डॉ. तुषार देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येणार आहे.सदरील कार्यक्रमात साचलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडणे, लहान डबकी बुजविणे, व्हॅन्ट पाईपला जाणी बसविणे, जि.प शाळेत मार्गदर्शन व प्रतिज्ञा वाचणे, व्हॉलगळती काढणे. बस स्टॅन्डवर माहीती देणे, हिवताप हा आजारचे प्रकार ४ असुन १ प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स, २ प्लाझमोडियम फॅल्सीपेरम, ३ प्लाझमोडियम मलेरी ४ प्लाझमोडियम ओव्हेल असुन यापैकी १ प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स व प्लाझमोडियम फॅल्सीपेरम या दोन प्रकारचे रोगजंतु आपल्या विभागात आढळुन येतात. या रोगाचे प्रमुख खादय मानवी रक्तातील तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबीन होय. या रोग जंतुमुळे हिवताप हा आजार होते. सर्वप्रथम सन १८८९ मध्ये डॉ. सर रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाने रोग जंतुचा शोध लावला. तसेच वरील माहिती जनतेस पोहचविण्याकामी जिल्हा स्तरावरुन देण्यात येणार आहे.हिवतापाचा प्रसार हिवतापाचा प्रसार अॅनाफेलीस या जातीच्या डासामार्फत होतो. या जातीच्या डासाची मादी घरातील वापरण्यासाठी साठविण्यात आलेल्या पाण्याच्या साठ्यामध्ये, स्वच्छ पाण्याची डबकी, नारणाच्या करवंट्या जुनी टायर्स इ. वस्तुमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतात व तेथे त्या अंड्यापासुन नवीन डास उत्पत्ती होऊन अशा प्रकारे डासांची संख्या वाढुन हिवतापाचा प्रसार वेगाने होण्यास मदत होते.हिवतापाची प्रमुख लक्षणे व दुषपरीणाम हिवतापाचे रोग जंतु मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर यकृत व प्लीहाच्या पेशीमध्ये त्यांची वाढ होते तेथे त्यांचे जिवनचक्र पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागतो. त्यांनतर जेव्हा वरील रोगजंतु रक्तप्रवाहात मिसळुन रक्तातील तांबडया पेशीवर हल्ला करतात त्या रोगजंतुना मारण्यासाठी रुग्णाचे शरीराचे तापमान खुप वाढते. त्यामुळे त्याला भरपुर प्रमाणात थंडी वाजुन येते, रुग्णास मळमळल्या सारखे वाटते काही वेळेस उलट्या होतात, खुप डोके दुखते, नंतर भरपुर घाम येवुन ताप उतरतो व गाढ झोप लागत. पुन्हा २४ तासानंतर ताप येवुन वरील प्रमाणे त्रास होतो. खुप अशक्तपणा जानवतो व रक्तक्षय होण्याची शक्यता असते गर्भवती व बालकांना हितापापासुन सर्वाधीक धोका संभवतो विशेषतः प्लाझामोडीयम फॅल्सीपेरम या जंतुमुळे होणारा हिवताप हा मेंदुज्वर होण्यास कारणीभुत ठरतो. वेळीच समुळ उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते.राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय जळगाव यांच्यामार्फत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येते.*डास नियंत्रणासाठी उपाययोजना*> किटकनाशक फवारणी हिवताप पारेषण काळात ग्रामिण भागातीत हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गावामध्ये केओथिन लॅम्डा पावडर किटकनाशकांची घरोघरी फवारणी करतो.> जिवशास्त्रीय उपाय योजना किटकनाशकामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा विचार करुन राज्यामध्ये योग्य डासोत्पत्ती स्थानांमध्ये डासअळीभक्षक सोडण्यात येतात. सदर उपाय योजना ग्रामिण तसेच शहरी भागातही राबविण्यात येतात.कुठल्याही तापाकडे दुर्लक्ष करु नका. हा तापहिवताप असु शकतो> हा ताप हिवताप तर नाही, याबददल खात्री करुन घ्या.> औषध विक्रेतांच्या अथवा स्वता च्या अल्प ज्ञानावर तापाकरीता परस्पर औषधी घेवु नका.> हिवतापाच्या निश्चीत निदानासाठी प्रा.आ. केंद्र व उपकेंद्र स्तरावर तापाच्या रुग्णांच्या रक्तनमुना घेवुन तो सुक्ष्मदर्शकाखाली तपासणी आवश्यक असते.> हिवताप पसरविणारे डास आपण साठविलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात.> पाण्याच्या टाक्यात डासांची उत्पत्ती होवु नये म्हणुन त्या दुरुस्त करणे, त्यास झाकण बसविणे व गळती थांबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.> दैनंदिन पाण्याच्या वापराकरीता घरामधील तसेच घराबाहेरील टाकी आठवडयातुन दोनदा पुर्णपणे रिकामी व स्वच्छ करुन पुन्हा भरणे व झाकुन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.> डासांचा उपद्रव पुर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व पिंपे, टाक्या इ. सर्व साठे डास प्रतिबंधक स्थीतीत आणी व्यवस्थीत झाकुन ठेवणे> परिसरातील घराजवळील पाण्याची डबकी वेळी बुजवा किंवा वाहती करावी व वाहत नसल्यास साचलेल्या डपक्यात गप्पी मासे कींवा कुड ऑईल टाकावे.वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही, व डास चावणार नाही, म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवीन त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण होण्यासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377