जळगाव दि. 26 – महाराष्ट्र राज्याचा ६५ वा स्थापना दिवस समारंभ मुख्य शासकीय कार्यक्रम दिनांक १ मे २०२४ रोजी ठिक ०८.०० वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे पाणी पुरवठा व स्वच्छता, तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील, यांचे शुभहस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व आई-वडील, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी केले आहे.महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे, यासाठी दि. १ मे २०२४ रोजी सकाळी ०७.१५ ते ०९.०० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावासा वाटल्यास त्यांनी तो सकाळी ०७.१५ च्या पूर्वी किंवा सकाळी ०९.०० च्या नंतर आयोजित करावा असे निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी ऐका प्रिसिध्दी पत्राकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377