आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
देश विदेश
Trending

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत “हर घर झंडा” अर्थात “राष्ट्रध्वजाभिमान”

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि.12 मार्च 2021 ते दि.15 ऑगस्ट 2023 या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तशा सविस्तर सूचना केंद्र शासनाने कळविल्या आहेतच. त्यानुसार राज्यात या कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत विविध शासन निर्णय/शासन पत्रांद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत दि.11 ऑगस्ट 2022 ते दि.17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात “हर घर झंडा” हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना वाचकांसाठी एकत्रितरित्या या लेखाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.

1) सर्व शासकीय / निमशासकीय यंत्रणांनी प्रसारमाध्यमातून देशाभिमान व जाणीव-जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवावी.

2) दि.11 ते दि.17 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक शासकीय/निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे.

3) नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वत: विकत घेऊन उभारण्यासाठी त्यांना प्रेरित करावे.

4) राष्ट्रध्वज उभारणीसाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा.

5) केंद्रीय गृह विभाग यांच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता 2002 भाग-१ मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे “हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सूत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल, या तरतूदीमध्ये बदल करण्यात आला असून या बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतूदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल.

6) संगीतातूनही राष्ट्रध्वजाबाबत वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करता येईल.

7) “हर घर झंडा” या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी.

8) या उपक्रमामध्ये राज्य / देशातील / परदेशातील सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नोंद घ्यावी.

9) राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होण्याबाबत संबंधित यंत्रणांनी खात्री करावी.

10) ऑनलाईन व ऑफलाईन राष्ट्रध्वज विक्री केंद्र राज्याने उपलब्ध करून द्यावे.

11) भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव-जागृती करावी.

12) “हर घर झंडा” या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाची छायाचित्रे, चित्रफिती, ध्वनीमुद्रण इ. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करावे.

13) नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत रुची निर्माण करण्यासाठी वेबसाईट, ई-कॉमर्स तसेच राष्ट्रध्वज भेट देणे अशा माध्यमांचा आधार घेण्यात यावा.

14) स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा.

मार्गदर्शक कृती आराखडा

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि.12 मार्च 2021 ते दि.15 ऑगस्ट 2023 या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाने कळविले आहे. त्यानुसार राज्यात या कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत शासन निर्णय/शासन पत्रांद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत दि.11 ऑगस्ट 2022 ते दि.17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात “हर घर झंडा” हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरीकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा. याबाबतचा मार्गदर्शक कृती आराखडा जाणून घेऊ या, या लेखाच्या माध्यमातून..

(अ) कृती आराखडा: ग्रामपंचायती

  • सर्व ग्राम पंचायती ग्रामीण प्रसारासाठी महत्वपूर्ण माध्यम.
  • संबंधित विभागाच्या स्तरावर आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रमुखांबरोबर संपर्क सत्रे / चर्चासत्रे यांचे आयोजन करावे.
  • प्रत्येक गावात ध्वज वितरण आणि विक्री केंद्राची निश्चिती करावी. बचतगटांचा सहभाग स्थानिक शिलाई काम करणाऱ्या गटांद्वारे ध्वजांची शिलाई/निर्मिती करता येईल.
  • विक्री / वितरण केंद्र म्हणून ग्रामपंचायत कार्यालयांचा उपयोग करुन घ्यावा.
  • ग्रामपंचायतींद्वारे ध्वजांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करता येईल. ही खरेदी स्थानिक घरांच्या संख्येवर आधारित असावी.
  • सर्व शासकीय इमारती / संस्थांवर ध्वजारोहण करावे.
  • स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घ्यावे.

(आ) कृती आराखडा: आरोग्य केंद्रे, रुग्णालये + आशासेविका

या उपक्रमात आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, उपविभागीय रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालये यांचा महत्वपूर्ण सहभाग अपेक्षित आहे,

  • संदेश वहन साहित्य – प्रसिध्दी पत्रके, उभे फलक, बॅनर्स इत्यादी स्थानिक भाषेत ठळकपणे प्रदर्शित करावेत.
  • प्रसुतिगृहातील सहाय्यक परिचारिकांना तिरंग्याची माहिती असलेल्या पुस्तिका (फ्लिप बुक्स) यांचे वाटप करावे.
  • लहान मुलांना रंग देण्यासाठी छापील आकृत्या, छापील कागद (कटआउट्स, प्रिंटआउट्स) उपलब्ध करुन द्यावेत.
  • रुग्णालयातील प्रतिक्षा कक्षामध्ये डिजिटल पडदे लावावेत, ध्वज आणि कार्यक्रम संबंधित माहिती प्रदर्शित करावी, तिरंगा ध्वजगीत लावावे, आजादी का अमृत महोत्सव इ. बाबतचे चित्रपट दाखवावेत.

(इ) कृती आराखडा: रास्त भाव धान्य दुकाने (वाजवी किंमतीची दुकाने)

रास्त भाव दुकानांनी ध्वज वितरण विक्री केंद्र म्हणून काम पाहावे. या दुकानांमध्ये आणि त्याच्या सभोवताली पूर्व ध्वनीमुद्रित संदेश, सांगितिक जाहिराती (जिंगल), राष्ट्रध्वजावरील माहिती माईकवर प्रसारित करावी.

(ई) कृती आराखडा: शाळा आणि महाविद्यालये

  • पोलीस महासंचालकांद्वारे “हर घर झंडा”या कार्यक्रमाबाबत विशेष बैठकांचे आयोजन करावे.
  • विशेष तिरंगा मानवंदना संचलने आयोजित करावीत.
  • “हर घर झंडा”या कार्यक्रमाविषयी प्रचार प्रसार व जागरुकतेसाठी प्रचार साहित्य, पत्रिका व इतर साहित्य वितरीत करावे.
  • पथनाट्यांद्वारे “तिरंग्याची आण-बाण-शान”या संकल्पनेचा प्रसार करण्यात यावा.
  • पोलिस स्टेशन परिसरात फलक, प्रसिध्दीपत्रके, उभे फलक (स्टॅंडी) लावणे व ध्वजारोहण करणे.
  • पोलिस वसाहतींमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री व वितरण केंद्रे निर्माण करण्याची विशेष मोहीम घ्यावी.
  • सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वसाहतीमध्ये / घरी ध्वजारोहण करावे.
  • प्रत्येक पोलीस तपासणी नाक्यावर तिरंगा ध्वजाची प्रसिध्दीपत्रके लावावी.

(ऊ) कृती आराखडा: परिवहन सुविधा

  • राज्य परिवहनच्या बसेस “हर घर झंडा”याच्या संदेशाने रंगविल्या जाव्यात.
  • पथकर व तपासणी नाक्यांच्या माध्यमातून हर घर झंडा या कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार व जागरुकता निर्माण करण्यासाठी माहिती पुस्तिका, प्रसिध्दी पत्रके इ. वितरित करणे.
  • अंतरसंपर्क (इंटरकॉम) आणि ध्वनीचित्रमुद्रण (व्हिडिओ) प्रणालीद्वारे राज्यांतर्गत प्रवासी बसेसमध्ये सांगितिक जाहिराती (जिंगल्स), ध्वनीमुद्रित ध्वजगीत वाजविणे, ध्वज संबंधित चित्रफित दाखविणे.

(ए) कृती आराखडा: प्रसार माध्यमे संकेतस्थळ, भिंतीचित्रे इ.

  • सर्व राज्य सरकारच्या संकेतस्थळांवर अमृत महोत्सव संकेतस्थळ (amritmahotsav.nic.in) हर घर झंड्याचा दुवा जोडावा.
  • राज्य आणि जिल्हा स्तरावरील कृती आराखड्याबद्दल प्रसार माध्यमांना विशेष माहिती देणे. याअंतर्गत-
  • दि.01 जूनपासून दररोज विशेष बातमीपत्र सुरु करण्यासाठी दूरदर्शनचा, आकाशवाणीचा वापर करावा.
  • स्थानिक प्रसिध्दी अधिकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमांचे योग्य वार्तांकन करावे व त्यावर प्रकाशझोत टाकावा.
  • ध्वज निर्मिती, वितरण, देशभक्ती यांच्याशी संबंधित असलेल्या स्वारस्यपूर्ण कथा निर्माण कराव्यात.
  • सर्व सार्वजनिक बदलीच्या ठिकाणी भिंतीचित्रे (वॉल पेंटिंग्ज) निर्माण करावीत.

(एै) कृती आराखडा: महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत

  • सर्व महानगरपालिका, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत या नागरी भागातील प्रसारासाठी महत्वपूर्ण माध्यम आहेत.
  • महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या प्रशासकीय प्रमुखांनी संबंधित वॉर्डच्या अधिकाऱ्यांसमवेत समन्वय करून संपर्क सत्रे / चर्चासत्रांचे आयोजन करावे.
  • प्रत्येक वॉर्डात ध्वज वितरण आणि विक्री केंद्राची निश्चिती करावी.
  • बचत गटांचा सहभाग: स्थानिक शिलाई काम करणाऱ्या गटांद्वारे ध्वजांची शिलाई/ निर्मिती करता येईल.
  • विक्री / वितरण केंद्र म्हणून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयांचा उपयोग करून घ्यावा.
  • महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या आस्थापनांना ध्वजांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करता येईल. ही खरेदी स्थानिक घरांच्या संख्येवर आधारीत असावी.
  • सर्व प्रशासकीय इमारती / संस्थांवर ध्वजारोहण करावे.
  • स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घ्यावे.
  • संदेश वहन साहित्य – प्रसिध्दी पत्रके, उसे फलक, बॅनर्स इत्यादी स्थानिक भाषेत ठळकपणे प्रदर्शित करावेत.
  • महानगरपालिका / नगरपालिकांच्या रुग्णालयातील प्रतिक्षा कक्षांमध्ये डिजिटल पडदे लावावेत, ध्वज आणि कार्यक्रम संबंधित माहिती प्रदर्शित करावी, तिरंगा ध्वजगीत लावावे, आजादी का अमृत महोत्सव इत्यादी बाबतचे चित्रपट दाखवावेत.
  • राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलने / शिबीरे / चर्चासत्र इत्यादींचे आयोजन करावे.

महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत वसाहतींमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री व वितरण केंद्रे निर्माण करण्याची विशेष मोहीम घ्यावी.
जाहिरात फलक, बॅनर, फ्लिप बुक्स, सांगितिक जाहिराती (जिंगल्स), ध्वनीमुद्रित इत्यादीचे नमुने.
(ओ) केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून खालील स्वरुपाचे सहाय्य उपलब्ध केले जाईल—

आजादी का अमृत महोत्सव (amritmahotsav.nic.in) या संकेतस्थळावर हर घर झंडा कॉर्नर
अनुवाद करण्यासाठी व प्रसार व प्रचार करण्यासाठी पुरविलेली माहिती व संप्रेक्षण साहित्य डाऊनलोड कराव्यात.
जाहिरात फलक, बॅनर, फ्लिप बुक्स, सांगितिक जाहिराती (जिंगल्स), ध्वनीमुद्रित इ. चे नमुने.
ध्वजगीत व ध्वनिचित्रफित पुरविणे.
अशा प्रकारे “हर घर झंडा” अर्थात “राष्ट्रध्वजाभिमान” या उपक्रमात आबालवृद्ध सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\