
पाचोरा शहराचे विस्तारीकरण खुप मोठ्या प्रमाणात होत आहे शहराच्या चारही बाजूने नविन वसाहती होत आहे तसेच बाहेरील नागरिकांचे येथे स्थायिक होण्याचे प्रमाणही अधिकचेच आहे.शिवाय जळगाव जिल्ह्यातिल अग्रेसर एक विकसनशील तालुका म्हणून पाचोरा प्रगतिपथावर आहे. असे जरी असले तरी मागील तिन ते चार वर्षात गुन्हेगारि देखिल वाढत आहे हे सत्य नाकारता येणार नाही परंतु पोलिस यंत्रनेचे नियंत्रण असल्याने येथील अनेक घटना टाळल्या गेल्याचेही सत्य लपविता येत नाही.
पाचोरा येथे दि २४ जून रोजी कर्तव्यदक्ष पोलिस योगेश पाटील व त्यांचे टीमला मिळालेल्या माहिती नुसार आरोपी कल्पेश निकम याचे ताब्यातील एक पांढ-या रंगाची टाटा व्हीस्टा माँडेल असलेली कार क्र.MH-19-AX-9819 यात विनापरवाना तिन ईसम शस्र कब्जात बाळगुन असल्याने भडगांव ते पाचोरा रोडावर निर्मल सिडस कंपनी जवळ सार्वजनिक जागी सदर गाडीचे चेकिंग करून आरोपी- 1) कल्पेश निकम वय 25 रा. पाचोरा ता.पाचोरा 2) रोहीत साहेबराव झोडगे वय 22 रा. उत्तम नगर, शेवपुरी चौक, कृष्ण मंदीर समोरच्या समोर,रो हाऊस नं.02, नाशिक 3) नितीन बाबुराव नासरे वय 27 रा.पारस ता. बाळापुर जि.अकोला 4) एस.एन पाटील,ता.पाचोरा असे ऐकून चार जन वेळ- दिनांक 24/06/2022 रोजी सकाळी 03.00 वा सु 25,000/- रुपये किंमतीचा एक स्टीलचे राखाडी रंगाचे त्यावर काळे रंगाचे हँन्डग्रीप असलेले पिस्टल हे अग्निशस्त्र त्यास ट्रिगर व मँगझीन असलेले हे विना परवाना व टाटा कंपनीची इंडीका व्हीस्टा माँडेल कार मध्ये बसुन घेवुन कब्जात बळगतांना मिळुन आले म्हणुन पोलीस स्टेशन भाग 06 गु.र.न 284/2022 भारतीय हत्यार कलम 3/25 प्रमाने फिर्यादी पोनाकाँ/ 3261 विकास देविदास खैरे नेमनुक पाचोरा पोलीस स्टेशन यांचे फिर्याद प्रमाने सदर गुन्हा दाखल करून एकुण २,७५,०००/- रुपये कि माल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास तपास मा.पो.नि सो किसनराव एल. नजनपाटील यांचे आदेशाने सफो १५८७ प्रकाश पाटील यांचे कडे दिला आहे. याकामी पि.एस.आय गणेश चौबे,ए.एस.आय सुनील पाटील,पो.कॉ योगेश पाटील ,प्रवीन परदेशी,समीर पाटील आदिनी सदर कामी मोलाची भूमिका निभावली
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



