जळगाव.दि.३- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाकरिता सर्वसामान्य निरीक्षक निश्चित करण्यात आले असून
०३ जळगाव लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षकम्हणून डॉ. राहुल गुप्ता (आय.ए.एस ) , दुसरे मतमोजणी निरीक्षक सीमाकुमार उदयपुरी ( एस. सी. एस ) असणार आहेत. मतमोजणी संदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी श्री. आयुष प्रसाद – ८२७५९७०६७२ या क्रमांकावर संपर्क किंवा उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर – ७९७२७०४०७९ या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करता येईल.
०४ रावेर लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून पुस्पांजली दास ( आय.ए. एस ) , दुसरे मतमोजणी निरीक्षक – महेंदर पाल ( आय.ए.एस ) असणार आहेत. रावेर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अंकुश पिनाटे किंवा ९४२१३२३३६६ उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर – ७९७२७०४०७९ यांच्या या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करू येईल.
०३ जळगाव लोकसभा मतदार संघ आणि ०४ रावेर लोकसभा मतदार संघाच्या चारही निरीक्षकांचे आगमन झालेले आहे. ०३ जळगाव लोकसभा मतदार संघ आणि ०४ रावेर लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांचे माहितीकरिता मतमोजणी निरीक्षक यांना केवळ लोकसभा निवडणूक मतमोजणी संदर्भात संपर्क साधण्यासाठी दिनांक ३ जून, २०२४ पासून दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत या वेळेत कार्यालयीन पत्त्यावर 'राजगड' अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे संपर्क करू शकता, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद आतुर्लीकर यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377