शिक्षक मतदार संघ; चार नामनिर्देशन अर्ज दाखल
नाशिक, दि.4 जून – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मंगळवार दि.4 जून ,2024 रोजी 4 उमेदवारांनी 4 नामनिर्देशन अर्ज सादर केले असून आत्तापर्यंत 13 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, अहमदनगर यांनी अपक्ष पक्षातून अर्ज सादर केला आहे. कचरे भाऊसाहेब नारायण, अहमदनगर, अमृतराव रामराव शिंदे, अहमदनगर व दराडे किशोर भिकाजी, नाशिक यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी दि. 4 जून, 2024 रोजी 11 जणांनी नामनिर्देशन अर्ज नेले आहेत.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377