
पाचोरा: बाजार समिती शेतक-यांसाठीच आहे.मागील ३ वर्षांपूर्वीच्या कारभारामुळे शेतकरी, व्यापारी व अन्य घटक प्रशासनापासून दुरावले आहेत. त्यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करु.घटलेला महसूल वाढवून बाजार समितीला पुर्ववत विकासाकडे नेऊ, असे सभापती,श्री.गणेश बापु यांनी सांगितले.
श्री.गणेश बापु यांनी सोमवारी पदभार स्विकारला.व लागलीच अवघ्या २४ तासात व्यापारी -आडत्यांची बैठक घेतली यावेळी बाजार समितीचे उपसभापती श्री.पि.ए.पाटील साहेब व्यापारी संचालक श्री.मनोज भाऊ सिसोदिया, श्री.राहुल संघवी,तसेच श्री.बापुसो सुनिल पाटील,श्री.दादासो लाखीचंद पाटील,श्री.युसूफ पटेल. तसेच सचिव श्री.बोरुडे साहेब व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. कामकाजाची माहिती घेतली.सध्या बाजार समितीत व्यापाऱ्यांना काही अडचणी आहेत.व असतील त्या अडचणी लगेचच दुर केल्या जातील. शेतकरी व व्यापारी तसेच अन्य घटकांना येणा-या अडचणी सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल. मध्यंतरी झालेल्या चुकीच्या कारभाराने शेतकरी तसेच विविध घटकांनी नाराजी व्यक्त केली.विविध अडचणी सांगतिल्या.हे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी ते म्हणाले, बाजार समितीत विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर आपला भर आहे. त्यासाठी सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. जिल्ह्याभरातून तसेच जिल्ह्याबाहेरून देखील शेतकरी येथे शेतमालाच्या विक्रीसाठी येतात. अनेकांना येण्यासाठी व परततांना रात्र होते. या कालावधीत त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी यापुढे बाजार समितीचे लिलावाचे कामकाज हे जलद गतीने वेळोवेळी करण्यात येणार आहे.
बाजार समितीच्या संचालकांसह व्यापाऱ्यांना सोबत घेऊन बाजार समितीची त्यांनी पाहणी केली.शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी आदी घटकांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या श्री.गणेश पाटील यांनी जाणून घेतल्या आहेत.
शेतकरी,व्यापारी प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे येथील गैरसोयी दुर केल्या जातील. येथील रस्ते व मार्केटचे गटारीचे काम सापसफाई पावसाळ्या आधी त्वरीत पूर्ण करण्यात येईल.असे आश्वासित केले आहे..
यावेळी अडत – व्यापारी असोसिएशन चे अध्यक्षासहित सर्व पदाधिकारी व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



