सी.सी.आय तर्फे पाचोरा येथे कापुस खरेदी विक्रीसाठी नाव नोंदणी सुरु, कृ.उ.बा.स.सभापती-गणेश भिमराव पाटील.

पाचोरा-भडगाव तालुक्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती पाचोराच्या कार्यक्षेत्रातील भारतीय कपास निगम लि. (सी.सी.आय) केंद्र पाचोरा येथे कापुस खरेदी विक्रीसाठी नाव नोंदणी सुरु.
पाचोरा, दि २८ – कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा भडगाव तर्फे तमाम कापुस उत्पादक शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येते की, भारतीय कपास निगम लि. (सी.सी.आय) ची कापूस खरेदी दि. ०१/१२/२०२३ पासून श्री. गजानन जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी, गिरड रोड पाचोरा येथे प्रारंभ होत आहे. सदर सी.सी. आय च्या सन-२०२३-२४ हंगाम कापूस खरेदीसाठी नवीन नियमाप्रमाणे नोंदणीस प्रारंभ झाला असून ह्या करिता प्रत्यक्ष श्री गजानन जिनिंग प्रेसिंग गिरड रोड, पाचोरा, येथे येऊन ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. आधार कार्ड ची झेरॉक्स, सन २०२३-२४ मध्ये कापुस पिक पेरा लावलेला ७/१२ उतारा, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा, तसेच आधार कार्ड व बँक खात्याला एकच मोबाईल नंबर लिंक असावा, रजिस्ट्रेशन साठी स्वतः येणे गरजेचे आहे. शासकीय किमान आधारभूत किंमत ७०२० असून कापसातील पाण्याची आद्रते नुसार सी. सी. आय केंद्रावर कापसाची खरेदी केली जाईल.
तरी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस हा शेतीमाल काडी कचरा विरहित,FAQ दर्जाचा सी.सी.आय. केंद्र पाचोरा येथील श्री गजानन जिनिंग प्रेसिंग गिरड रोड, पाचोरा, जि. जळगाव येथे संपर्क करून आणावा असे आव्हान बाजार समितीचे सभापती यांनी केले.
यावेळी सभापती श्री. गणेश भिमराव पाटील, उपसभापती श्री. प्रकाश अमृत पाटील, बाजार समितीचे सर्व संचालक व बाजार समितीचे सचिव उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



