
पाचोरा-दिनांक:१०/०८/२०२२ रोजी पाचोरा येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्ताने आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.त्या अनुषंगाने 'स्वराज महोत्सव अंतर्गत पाचोरा शहरात महिला मेळावा व पथविक्रेते यांच्यासाठी दि.१० ऑगस्ट २०२२ रोजी नगरपरिषदेच्या राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये सकाळी ११.०० वा. साजरा करण्यात आला. यामध्ये महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य यासाठी जनजागृती व महिला बचत गटास मार्गदर्शन करण्यात आले सदरचे मार्गदर्शन हे पाचोरा शहरातील जेष्ठ समाज सेवक श्रीमती.रजनीताई शरद पाटील ह्यांच्या अध्यक्षतेखाली करणात आले. तसेच पाचोरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर यांनी प्रास्ताविक मांडून DAY-NULM व PM स्वनिधी योजनेची माहिती देऊन सद्यस्थितीचा आढावा मांडला. तसेच ७ लाभार्थीना PM स्वनिधी योजने अंतर्गत १० व २० हजाराचे कर्ज वाटप करण्यात आले व DAY-NULM अंतर्गत ३ बचत गट व २ वैयक्तिक लाभार्थी यांना कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले, व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप करून गौरवण्यात आले.
भारतीय स्टेट बँकचे मुख्य शाखा व्यवस्थापक श्रीमती सोनाली पवार यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण का गरजेचे आहे व त्याचा महिलांच्या आयुष्यात काय उपयोग होतो ह्याचे महत्व पटवून दिले. सदर कार्यक्रमासाठी नगरपालिकेचे प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, दीनदयाल अंत्योदय योजनेचे व्यवस्थापक संदीप भोसले, विधी अधिकारी भारती निकम, लिपीक ललित सोनार, कृष्णा व्यास, रविंद्र पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री लासूरकर, विजय सैंदाणे, अनिल वाघ, सोनाली राजपूत, कल्याणी वारुळे, ज्योती चौधरी, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक श्रीमती अस्मिता पिंपळखरे, जळगाव जनता सहकारी बँकचे प्रतिनिधी व ICICI बैंक, IDBI बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चे प्रतीनिधी इ उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ललित सोनार यांनी केले तर आभार संदिप भोसले यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



