आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

राज्यातील ५० गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता-मंत्री गिरीश महाजन

मुंबई दि.२६ : राज्यातील ५० गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ भव्य व सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री महाजन यांनी सदर ५० गावाच्या प्रस्तावास मान्यता दिली . या माध्यमातून जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, नंदुरबार पुणे, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधूदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर, आदी जिल्ह्यांतील गावांची निवड करण्यात आली असून लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहितीही श्री महाजन यांनी दिली.विविध जिल्ह्यातीलपहूरपेठ,वाकोद,पहुरकसबे, ता जामनेर, लोहारा, कुऱ्हाड.ता, पाचोरा. म्हसावद ता.जळगाव,अहिरवाडी,ता रावेर.शिरसाला,ता.बोदवड,चहार्डी या चोपडा, पाळधी,ता.धरणगाव,निमगाव घाना.ता, अहमदनगर , मोहरी ता.पाथर्डी,आस्तेगाव.ता.राहता,मुकिंदपूर ता.नेवासा,पट्टनकोडोली.ता.हातकंणगले,अदमआपूर ता.भुदरगड(गारगोटी),वाशी,ता करवीर,घाणेवाडी ता जालना, टेंभुर्णी,ता जाफराबाद,चिंचोली निपाणी,ता, भोकरदन,आनंदगाव,ता परतुर, म्हसावद ता शाहदा,नागरे ता पुरंदर,जाडकरवाडी ता, आंबेगाव, माळेगांव,रीसनगांव ता.लोहा, शेळगाव छत्री) ता.नायगाव(खै),वझरगा.ता देवलूर, नरसी, ता.नायगांव,पोफळी ता.उमरखेड,मंगलादेवी ता.नेर, चिखलगाव ता.वणी, धनगरवाडी,ता.दारव्हा, मारवाडी बु.पुसद,भरणे.ता.खेड, कांबळेश्वर ता.फलटण,टाकेवाडी ता.माण,वाठार स्टेशन,ता, कोरेगाव,तरंदल (धनगरवाडी)ता कणकवली,खेडी,ता सावली,बेम्बाळ ता. मूल,थुतरा ता. कोरपना तेमुर्डा ता. वरोरा, भंगाराम तळोधी,ता.गोडपिंपरी, नवरगाव ता.सिंदेवाही,वाठोडा शुक्लेश्वर ता.भातकुली,घोराड ता.कळमेश्वर,रोहणा -इंदरवाडा ता.नरखेड,बेला ता.उमरेड,केळवद,ता.सावनेर.या ५० गावांमध्ये समावेश आहे.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहासाठी निवडण्यात आलेल्या गावातील ग्रामपंचायतींच्या वतीने सभागृह बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात देण्यात येणार असून सुसज्ज असे ५० सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहेत .या माध्यमातून धनगर तसेच भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांसाठी सभागृहातच्या माध्यमातून सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती माजी खासदार श्री विकास महात्मे यांनी दिली आहे.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!