जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024-दुसऱ्या दिवशी जळगावसाठी 25 उमेदवारांनी 60 अर्ज तर रावेरसाठी 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले
एकही अर्ज दाखल नाही
जळगांव दि.19 – लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.19 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी
25 उमेदवारांनी 60 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले. तर दुसऱ्या दिवशी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 25 .उमेदवारांनी60 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी रोप खान कादिर खान, मालेगाव यांनी आयुष्या सिद्धीका रऊफ खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना)2, रौफ खान कादिर खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना)1, राऊफ खान कादिर खान यांनी रहमत बी कादर खान, मालेगाव ( भारतीय टायगर सेना) यांच्यासाठी 1, महेंद्र देवराम कोळी कळमसरा तालुका अमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिक पार्टी)3, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी प्रभाकर गोविंदा सोनवणे जळगाव( अपक्ष)4, प्रदीप शंकर आव्हाड जळगाव( अपक्ष)3, राजेश हरी सपकाळे, मोहाडी ( अपक्ष)1, मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी करण बाळासाहेब पाटील पारोळा( शिवसेना उ. बा. ठाकरे) यांच्यासाठी 4 मुकेश तुळशीराम महाले जळगाव यांनी श्रीमती अंजली करण पाटील पारोळा( शिवसेना उ. बा. ठाकरे ) यांच्यासाठी 4 अरुण रोहिदास जगताप धुळपिंपरी तालुका पारोळा, ( अपक्ष) 4, युवराज प्रकाश बारी जळगाव( अपक्ष)2, डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (भाजपा 1, अपक्ष 1) निळकंठ प्रकाश पाटील, भातखंडे तालुका पाचोरा ( अपक्ष)1, निळकंठ प्रकाश पाटील भातखंडे यांनी सौ वैशाली निळकंठ पाटील ( अपक्ष) यांच्यासाठी 1, जळगाव ( अपक्ष-1, बहुजन विकास आघाडी -1), गणेश हिंमत पाटील तळई तालुका एरंडोल( अपक्ष-1, वंचित बहुजन आघाडी-1), नामदेव पर्वत पाटील जळगाव यांनी सुनील दत्तात्रय पवार, जळगाव( अपक्ष)2, राहुल नारायण बनसोडे भुसावळ ( बहुजन समाज पार्टी) 4, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव यांनी मेघना आत्माराम सूर्यवंशी(अपक्ष ) यांच्यासाठी 2, डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगाव ( अपक्ष)2, ऍड. वासुदेव धोंडू वारे, कासोदा ( अपक्ष) 2, मुकेश मुलचंद कोळी, शिरसोली( अपक्ष) 1, विजय बाबुलाल दानेज, जळगाव ( अपक्ष) 4, अंकित मुकुंद कासार, जळगाव यांनी कुलभूषण विरभान पाटील जळगाव ( अपक्ष) यांच्यासाठी 4, मांगो पुंडलिक पगारे, भडगाव (बहुजन महा पार्टी) 2 असे एकूण 25 उमेदवारांनी 60 नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत.
04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले आहेत. त्यात संजय कुमार लक्ष्मण वानखेडे, भुसावळ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( सोशल)2, अनंत वसंत बागुल, जळगाव( अपक्ष)2, भिकनराव तानकु बाविस्कर, लासुर तालुका चोपडा, ( अपक्ष)4, प्रवीण समाधान पाटील, रावेर यांनी श्रीराम दयाराम पाटील, रावेर( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी4, योगेश सुखदेव बाविस्कर आसोदा, यांनी नितीन प्रल्हाद कांडेकर कोल्हाळा तालुका मुक्ताईनगर( अपक्ष)4, रामदास संपतराव कटक, नांदुरा तालुका नांदुरा( अपक्ष)2, श्रीमती कोमल बापूराव पाटील चहार्डी तालुका चोपडा( अपक्ष)1, अशोक त्र्यंबक इंगळे उचंदा( भूमी मुक्ती मोर्चा)4, शिवाजी रामदास पाटील जळगाव यांनी श्रीमती शितल समर्थ अंभोरे अकोला ( अपक्ष) यांच्यासाठी 2, हर्षल राजेंद्र जैन, नशिराबाद यांनी संतोष भाऊ शबिंदास चौधरी भुसावळ ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांच्यासाठी 4, आत्माराम मांगो सूर्यवंशी जळगाव (अपक्ष )यांचेसाठी 2, राहुल नारायण बनसोडे, भुसावळ (बहुजन समाज पार्टी )3, डॉ. आशिष सुभाष जाधव, जळगांव (अपक्ष )2, विजय प्रभाकर पवार, भुसावळ, यांनी संजय पंडित ब्राह्मणे, भुसावळ ( वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी 2, बबन मुरलीधर कांबळे भुसावळ यांनी श्रम विभाग भानुदास पाटील फैजपूर( वंचित बहुजन आघाडी)2, शेख कुरबान शेख करीम, फैजपूर(एम आय एम )4, युसुफ खान युनूस खान, जळगाव यांनी गयासुद्दीन रसोफुद्दीन काझी, रावेर ( अपक्ष) यांच्यासाठी 2 असे एकूण 17 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ व 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377