जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक -2024,जळगाव जिल्ह्यात राबविली चार स्तरीय पद्दत,नामनिर्देशन सेवा केंद्रामुळे उमेदवारांना झाले सोयीचे
जळगाव – जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्यापासून ते उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत चार स्तरीय पद्दत अवलंबिल्यामुळे 26 एप्रिल रोजी छाननी एकदम सुलभ झाली. उमेदवारांचे योग्य कागदपत्र असल्यामुळे फारसे अर्ज अवैध झाले नाहीत अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. *चार स्तरीय प्रक्रिया*टेबल क्रमांक एकवर नामनिर्देशन पत्र व शपथपत्र फॉर्म नं.26 वाटप करण्यात आले.तसेच अनामत रक्कम स्विकृती,उमेदवारांचा फोटो, नमुना स्वाक्षरी व संपर्क पत्ता स्विकृती,उमेदवारांना निवडणूक विषयक सर्व नमुने व साहित्य वाटप व पोहोच घेणे ही सुविधा देण्यात आली. टेबल क्रमांक दोनवर शपथपत्र फॉर्म नं.26 व अतिरिक्त कागदपत्र तपासणी. (चेकलिस्ट नुसार तपासणे.),बँकेचे खातेपुस्तक तपासणी या सुविधा येथे देण्यात आल्या.टेबल क्रमांक तीनवर नामनिर्देशन पत्र व कागदपत्रे स्कॅनिंग करण्याच्या सुविधा देण्यात आल्या. याबरोबर चौथ्या टेबलवर संगणक कक्ष – सर्व संबंधित माहिती सुविधा प्रणालीत भरणे तसेच अधिकृत्त संकेतस्थळावर दैनंदिन माहिती भरण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली. या गुणवत्तापूर्ण सेवामुळे सगळी प्रक्रिया सुलभ झाली. जळगाव मध्ये फक्त चार उमेदवारांचे अर्ज अवैध झाले तर रावेर मध्ये दोन उमेदवारांचे अर्ज अवैध झाले.शपथ घेण्यासाठी विशिष्ट डायस पासून ते डिजिटल घड्याळापर्यंत सगळ्या गोष्टीचे नियोजन केल्यामुळे अवघ्या काही मिनिटाच्या आत नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण होत होती. शेवटचे नामनिर्देशन पत्र शेवटचे तीन मिनिट असताना पूर्ण झाले. सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना ही सर्व प्रक्रिया समजून सांगितलेली होती. त्यामुळेही ही प्रक्रिया अधिक सुरळीत होण्यास मदत झाल्याचे रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377