बंदी असलेल्या गुटक्याची वाहतूक करनारा इसमावर कारवाई.
पाचोरा – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार 03 जळगांव लोकसभा मतदार संघांतर्गत 18- पाचोरा विधानसभा मतदार संघात मा. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जळगांव यांचे आदेशान्वये Static Survillance Team (SST ) पथक स्थापन करण्यात आलेले आहेत. सदर पथकास श्री. भूषण अहिरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांचे मार्गदर्शनाखाली नेमणूक केलेले पथक कामकरीत आहेत. सदर पथकाने दिनांक 28/04/2024 रोजी खडकदेवळा खु. ता. पाचोरा येथे तपासणी करीत असतांना सायंकाळी 6.30 वाजता पवन समाधान चव्हाण रा. हनुमंतखेडा ता. सोयगांव जि. छ. संभाजीनगर हा त्याचे मालकीची मोटर सायकल MH-20 FX – 9933 यावर बंदी असलेल्या गुटक्याची वाहतूक करीत असल्याचे तपासणी दरम्यान पथक प्रमुख श्री. अमोल वनसिंग पाटील, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा व त्यांचे पथकातील सहकारी यांना आढळून आला आहे. बंदी असलेल्या गुटक्याची अंदाजित किंमत सोळा हजार असून पकडण्यात आलेला बंदी असलेला गुटका हा पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. पवार यांचे ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आलेला आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377