मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ येथे प्रवेश प्रक्रिया सुरु
जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग संचलित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ येथे सन 2024 -25 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इयत्ता ८ वी ते महाविदयालयात पदवी / पदवीका प्रथम वर्षासाठी शिक्षण घेणाऱ्या व भुसावळ शहरात शिकणाऱ्या गरजू विदयार्थ्यांना कळविण्यात येते की, सदर प्रवेशासाठी अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. परिपूर्ण भरलेला अर्ज घेवून वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्य अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील वसतिगृह प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल. तरी विदयार्थ्यांनी वरील पत्त्यावर संपर्क साधावा. वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, गणवेश, निर्वाह भत्ता व इतर सुविधा दिल्या जातील,अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन, गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भुसावळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377