मतदार संघ निवडणूक 2024;दिव्यांग मतदारांसाठी आवाहन
नाशिक, दि.१९ जून, २०२४ – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत जर एखादया अंध व्यक्तीला किंवा हाताने मतदान नोंदविण्यास असमर्थ असलेल्या दिव्यांग व्यक्तीला मदतनीस किंवा साथीदाराच्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याने त्याबाबतची पुर्वसूचना द्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.यासाठी संबंधित मतदाराने लेखी स्वरुपात पुराव्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ तथा विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांना मतदानाच्या तारखेच्या किमान ३ दिवस अगोदर म्हणजेच दि. २२ जून, २०२४ (शनिवार) सायं. ६.१५ वाजेपर्यंत द्यावी, असेही डॉ. गेडाम यांनी कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377