जळगाव – येथील महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे जळगाव शाखेच्या वतीने नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार कोल्हे विवेक बिपिनदादा यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आज तारीख 22 रोजी जळगाव येथे बिपिनदादा कोल्हे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
नाशिक विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघाची चुरस वाढली आहे. या निवडणुकीत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध असलेले युवा नेतृत्व कोल्हे विवेक बिपिनदादा यांची लोकप्रियता व मतदारांना दिलेले ठोस आश्वासन लक्षात घेता पुरोगामी विचारसरणीच्या महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेने विवेक कोल्हे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पुरोगामी विचारसरणीचे सर्व शिक्षक भगिनींनी विवेक भैय्या कोल्हे यांना प्रथम पसंतीचे मत द्यावे असे आवाहन शिवाजी शिंदे यांनी यावेळी केले. संघटनेने पाठिंब्याचे अधिकृत पत्र बिपिनदादा कोल्हे यांना दिले असून याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भावेश पाटील, जिल्हा सहसचिव चंद्रकांत पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष कृष्णराव पाटील, कार्यकारणी सदस्य स्वप्निल बागुल, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांचे समवेत ग. स. पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रवींद्र सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य विकास तात्या पाटील, अजय दादा देशमुख, अनिल दादा सोनवणे, ॲड.पियुष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377