पाचोरा बाजार समितीत आ.किशोरआप्पा पाटील व स.गणेश पाटील यांचेसह संचालक मंडळ,कर्मचारी यांची स्वच्छता मोहीम.

पाचोरा – राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील १०० दिवसांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मा.मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने मा. पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि. १९/०३/२०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दररोज शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार होता असतात. असे व्यवहार होत असतांना बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात घनकचरा, पाला, पाचोळा, निर्माल्य संचित होत असतो.
बाजार आवारामध्ये शेतमाल खरेदी विक्रीसाठी दररोज हजारो शेतकरी, हमाल-तोलारी, आडते, व्यापारी व इतर अनुषंगिक घटकांची मोठ्या प्रमाणात ये जा होत असते. बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याने या सर्व घटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो. राज्यातील सर्व बाजार समित्यांचे आवार स्वच्छ करण्याची मोहीम पुढील १०० दिवसात राबविण्याचे पणन विभागाने निश्चित केलेले आहे.
सदरचे अभियान राबविण्यासाठी बाजार समितीतील सर्व संचालक मंडळ,अधिकारी, कर्मचारी, आडते, व्यापारी, हमाल – तोलारी व संबंधित घटक यांचा सहभाग अभियानात असावा असा पणन संचालक यांच्या सूचना आहेत.त्याअनुषंगाने सदर अभियाना अंतर्गत बाजार समितीच्या पाचोरा येथील मुख्य यार्डात दि. २३/०३/२०२५ वार रविवार रोजी सकाळी ठीक १०.०० मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील व म.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पाचोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील उपसभापती प्रकाश अमृत पाटील, संचालक प्रकाश शिवराम तांबे, मनोज प्रेमचंद सिसोदीय, युसुफ भिकन पटेल, सुनिल युवराज पाटील, लखीचंद प्रकाश पाटील, राहुल रंगराव पाटील,राहुल रामराव पाटील, विजय कडू पाटील, बाजार समितीतील व्यापारी सुभाष जगन्नाथ पटवारी, संजय छगनलाल सिसोदिया, राजेश पटवारी, नंदू पाटील, पारस जैन यांच्या सह बाजार समितीचे सचिव व सर्व कर्मचारी तसेच हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर अभियानाअंतर्गत बाजार समितीतील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व येथून पुढे असे स्वच्छता अभियान राबविण्याचा मानस मार्गदर्शक मा.आमदार सो किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला व तश्या सूचना बाजार समिती प्रशासनास दिल्या. सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने आभार व्यक्त केले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



