पाचोरा – येथील रोटरी क्लब पाचोरा -भडगाव व कौसल्या पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा येथील पोलीस बांधवांच्या रक्त घटकांची तपासणी करण्यात आली. “डॉक्टर्स डे” च्या अवचित्याने आयोजित या रक्त घटक तपासणी शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय येरूळे यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदर्डे, कौसल्या लॅबचे संचालक डॉ. गोरख महाजन, प्रोजेक्ट डायरेक्टर रो. निलेश कोटेचा, उपनिरीक्षक योगेश गणगे, परशुराम दळवी, प्रकाश चव्हाणके, ग्रेड उपनिरीक्षक प्रकाश पाटील व सुनील पाटील उपस्थित होते.
पोलीस खात्यात नोकरी करत असताना “आरोग्याबद्दलची सतर्कता आणि कर्तव्य बद्दलची तत्परता” या दोन गोष्टी जपणे आवश्यक आहे, -असे मत पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांनी यावेळी व्य शीक्त केले.
पोलीस खात्याच्या धकाधकीच्या जीवनात पोलिसांनी नियमित आरोग्य तपासणी करावी व लहान मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घ्यावेत म्हणजे जीवनावरील संकट टाळता येते, -असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी यावेळी बोलताना केले.
या शिबिरात पोलीस बांधवांच्या रक्तातील शर्कराचे प्रमाण आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी करण्यात आली. याप्रसंगी रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य रो. भरत सिनकर, रो. चंद्रकांतजी लोढाया, रो.डॉ. अमोल जाधव, रो. डॉ. बाळकृष्ण पाटील, रो,रूपेश शिंदे, रो. डॉ. मुकेश तेली, रो. डॉ .घनश्याम चौधरी, डॉ. तौसिफ खाटीक, हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील, दिलीप वाघमोडेbतसेच राहुल बेहरे, गजू काळे, अनिल येवले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी विनोद बेलदार, गुणवंत पाटील, राहुल शिंपी, नरेंद्र नरवाडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती बोरसे, प्रियंका अहिरे व कौसल्या लॅब च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377