विद्युत कॉलनी/ गांधीनगर रहिवासीयांची होत आहेत रस्ता विना हाल पण नगरपालिका प्रशासनास केव्हा येईल जाग अशी खमंग चर्चा परिसरात होत आहे
पाचोरा,दि 29 जुलै – विद्युत कॉलनी भडगाव रोड परिसर येथील रस्ते व पत्रकार उमेश राऊत यांच्या घरापासून तर हायवे लगत जात असलेल्या रस्त्याची दुरावस्था झालेली असून मागील सात ते आठ वर्षांपासून साधी डागडुजी सुद्धा झालेली नाही सदर रस्ता हा फुटभर खाली गेलेला असून येथील रस्त्यांच्या मध्यभागी असलेली चारीची माती धसलेली दिसते. विद्युत कॉलनी मधील सर्वच आतील भागातील रस्ते खराब झालेल्या अवस्थेत असून सदर रहिवाशांची त्रेधातिरपिट उडताना दिसत असते. रस्त्यांचे पानी लोकांच्या कंपाऊंड मध्ये शिरते तरी सदर ऐरियातील कामे आता होणे गरजेचे असून त्यासाठी गतिमान हालचाली होण्याची अपेक्षा आहे
इंदिरानगर परिसरापासून ते मानसिंगा कॉलनी पर्यंत असलेला हा सात नंबरचा वार्ड मागील आठ वर्षापासून अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. पाच वर्षाचा नगरपालिकेचा नगरसेवकांचा कार्यकाळ वगळता प्रशासकीय राजवट सुरू असून देखील येथील विकास झाला नाही अशी चर्चा सबंध वार्डात नित्याची झालेली आहे. रस्ते,पानी,गटारी, आरोग्य सेवा,अस्वच्छता आदि समस्यांनी हा परिसर होरपळून निघाला आहे, ग्रस्त आहे ,येथील रहिवासी मागील 35 ते 40 वर्षापासून येथे वास्तव्यात असून देखील सुद्धा येथे सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल जे निवडून आले त्यांनीही कामे का केली नाही हा ऊहापोह मतदार करतीलच पण दुर्लक्षित राहिल्या बाबत लोकप्रतिनिधीनीं मोठा भिंग लावून शोध घ्यावा जेणे करून काहीतरी बोध बाहेर येईल. याच 7नं वार्डाने लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना भरघोस मतांनी लीड दिलेला असताना देखील या परिसरातील कामे न होणे हे कोणत्या शकुनीने रचलेलं कुंभाड आहे हे कदाचित आता लोकांनीच ओळखले असून उघड उघड अशा व्यक्तीं विषयी जनतेमध्ये चर्चा ऐकण्यास मिळत आहे.याचाच प्रतिबिंबित परिणाम हा येणाऱ्या नगरपालिका तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष अशा निवडणुकीतून जाणवेल यात काही शंका नाही.
नगरपालिका प्रशासन अधिकारी,कर्मचारी संबंधित बांधकाम विभागाचे इंजिनियर यांनी या गोष्टीकडे आता गांभीर्याने घ्यायचे आहे सदर रस्ता होण्यासाठी नगरपालिकेकडे लेखी मागणी वजा तक्रार पत्रकार उमेश राऊत यांनी केलेली आहे. अजून देखील सदर बाबत काहीही निर्णय घेतला गेलेला नसून रस्त्यांची झालेली दुरावस्था तसेच हा रस्ता भडगाव रोड हायवे येथील डाव्या व उजव्या बाजूच्या दोघी वसाहतींना जोडणारा प्रमुख रस्ता असून अत्यंत वर्दळीचा असल्याने असंख्य लोकांचे येथून येणे जाणे असते,शाळकरी विद्यार्थी,नोकरदार वर्ग असे अनेक नागरिक येथून जात असतात. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मोठ्या फोर व्हीलर गाड्यांचे चाक रुतने, टू व्हीलर स्लिप होणे, असे अपघात नित्याचे झालेले आहे,असे असताना देखील हा रस्ता न होता ज्या नवीन वसाहती झालेल्या आहेत ज्यांचे मतदान सुद्धा ग्रामीण भागात आहे अशा लोकांना सोयी सुविधा पुरवून महत्त्वाची प्लॉटींग स्थाने बघून कामे होत आहे अशी कुजबूज ऐकण्यात येते आहे असो,या उपरोक्त न बोलणेच बरे.
तरी सदर विद्युत कॉलनीतील रस्त्याबाबत तात्काळ स्वरूपात बैठक होऊन निर्णय व्हावा एवढी रास्त अपेक्षा नागरिक तूर्तास व्यक्त करीत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377