मा.नगरसेवक म.संजयनाना वाघ यांनी वार्ड क्र 9 मध्ये स्वखर्चाने सुरू केले रत्स्यांचे खड्डे बुजविण्याचे काम, जोपासली सामाजिक बांधीलकी.


पाचोरा, दि.30 – पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील प्रभाग क्रमांक 9 व 7 या वार्डांमध्ये रस्त्यांची समस्या निर्माण झालेल्या असून येथील नागरिक त्रस्त झालेले होते अशावेळी सदर परिसरातील नागरिकांनी ,सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी शिवाय तेथील माजी नगरसेवकांनी अनेक वेळेस नगरपालिका प्रशासनाकडे येथील रस्त्यांची डागडूजी करणे, नवीन रस्ते बनविणे ,सबंध वार्डातील अस्वच्छता दूर करणे ,रोगराई नष्ट होण्यासाठी फवारणी करणे, आदी समस्यांबाबत नगर पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, वेळेप्रसंगी उपोषणाचा इशारा दिला होता.असे असतानाही सदर वार्डांमध्ये अद्याप पावतो समस्यांचे निराकरण झालेले नसून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून विविध आजार तर निर्माण होतातच शिवाय अपघात होण्याचे प्रमाणही खूप वाढलेले होते .असे असताना वार्ड क्रमांक नऊचे माजी नगरसेवक श्री संजयनाना वाघ यांनी आपल्या स्वखर्चातून सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेऊन स्वखर्चाने संपूर्ण वार्डातील खराब झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सदर वार्डातील नागरिकांकडून केलेल्या या कार्याची दखल घेऊन कौतुक केले जात आहे व नगरपालिका प्रशासना विरुद्ध जन माणसांमध्ये एक वेगळा संकेत पोहोचला आहे. सतीश देशमुख,नंदू जोशी, प्रविण पाटील, पिंटू पाटील आदींनी मुरूम टाकते वेळी सहकार्य केले

खरे पाहता हे काम नागरिकांच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी नगरपालिकेने करण्यास हवे होते परंतु काय माशी शिंकली किंबहुना कोणते धृतराष्ट्र आहेत जे सदर वार्डातील कामे होऊ देत नाही अशी खमंग चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये रंगत आहे.
सदर वार्डात मोठ्या प्रमाणात रहिवास असून नवीन कॉलनी एरिया सुद्धा डेव्हलप होत आहे अशावेळी सोयी सुविधांची वाणवा होणे म्हणजे अकार्यक्षमतेचे हे लक्षण आहे का अशी टीका तेथील नागरिक करीत आहे याच वार्डातील ओपन स्पेस संदर्भात खूप मोठा विषय प्रलंबित आहे की जो विवादित आहे यावर सुद्धा नगरपालिका काही एक मार्ग काढत नसून सदर ओपन स्पेस ही विकासापासून वंचित झालेली आहे.तरी येथील सोयी सुविधांचा आढावा घेऊन व ओपन स्पेस संदर्भात काय ती तडजोड करून विकास झाला पाहिजे अशी रास्त अपेक्षा येथील नागरिक संवाद साधल्यावर बोलून दाखवीत आहे.
कुंभकर्ण ही सहा महिन्यातून एकदा जागा होत होता परंतु येथील वार्डात मागील पाच ते सात वर्षापासून विकास कामे का होऊ शकले नाही याची खात्री लोकांना आता पटली आहे झोपी गेलेला कुंभकर्णी प्रशासनाला आता तरी जाग येईल का हा यक्ष प्रश्न जनमनात निर्माण झाला आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



