गौर गरीब नागरिकाच्या आरोग्या साठी सामाजिक कार्यकर्त्ता निलेश उभाळे सरसावले.पाचोरा( पिंपळगाव हरे) -
ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे. ता पाचोरा येथे डॉ.अंजली पाटील MBBS व डॉ.गोपाल जंगले MBBS हे रुजू झाले असून सामाजिक कार्यकर्त्ता श्री निलेश उभाळे याच्या तक्रारी वर राज्यसरकार व जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दखल घेत व गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
पिंपळगाव हरे येथील ग्रामीण रुग्णालयात दोन एम.बी.बी.एस. डॉक्टर यांच्या जळगाव येथील सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांनी नियुक्ती केल्या आहे.
पिंपळगाव हरे येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातील २० ते – २५ गांवाचा आरोग्याचा कारभार चालतो. आणि याच ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यापासून गोरगरीब रुग्णांना डॉक्तरांसाठी भटकंती करावी लागत होती . नेहमी डॉक्टर नसल्याने रुग्णांना बाहेरून उपचार घ्यावे लागत होते . पिंपळगाव हरे येथे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या गावातील गोरगरीब रुग्ण दररोज ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर योग्य तो उपचार होत नव्हता .आणि रुग्णांना निराश होऊन परत जावं लागत होत.
म्हणून गौर गरीब नागरिकाच्या आरोग्या साठी भोजे येथील अभियंता सामाजिक कार्यकर्त्ता श्री.निलेश उभाळे सरसावले व त्यांनी ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे. येथे डॉक्टरयांच्या नियुक्ति साठी तक्रार राज्यसरकार व जिल्हा प्रशासना कड़े केली, व जळगाव येथील सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांच्याकडे पिंपळगाव हरे येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी केली असता त्यांची मागणी लवकरच मान्य करून दोन डॉक्तरांची पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली सिव्हिल सर्जन यांनी पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाची तात्काळ दखल घेऊन डॉक्टरांची नियुक्ती केली त्या मुळे गावातील ग्रामस्तानतर्फे त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे. दोघं डॉक्टरांनी गावातील जनतेला चांगल्या प्रकारे सेवा देऊन मागील असलेलं डॉक्टर यांच्या प्रमाणे आपल्या कामाचा ठसा उमटविला पाहिजे असे असे जनसामन्यातून बोलले जात आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377