आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोरा नगरपरिषदेच्या 16 सफाई कर्मचाऱ्यांचा वारसांना नियुक्तीचे आदेश;आ.किशोर आप्पा पाटिल यांच्या मुळे राज्यभरातील वारसांना लाभ


पाचोरा दि.6 – माझ्या राजकीय जीवनातील सर्वात सुंदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मला भाग्य लाभले असून माझ्या हातून पाचोरा पालिकेतील 16 कर्मचाऱ्यांना व आगामी महिन्याभरात सुमारे 40 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून आपण मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याची ही फलश्रुती असल्याने राज्यभरातील हजारो वारसहक्क कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळ तअसल्याने त्याचे आपल्याला मनस्वी समाधान असल्याचे मनोगत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले. सोमवारी पाचोरा नगरपालिकेने आयोजित केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.स्वर्गीय राजीव गांधी टाउन हॉल येथे सोमवारी दुपारी चार वाजता झालेल्या या कार्यक्रमात मंचावर प्रांताधिकारी भूषण अहिरे, मुख्याधिकारी मंगेश देवरे,माजी नगराध्यक्ष संजयगोहील,प्रवीण ब्राह्मणे,माजी नगरसेवक सतीश चेडे,बापू हटकर,देवराम लोणारी,हरिभाऊ पाटिल, रवींद्र पाटील, धर्मा वाघ उपमुख्य अधिकारी सोनवणे, डी एस मराठे,विशाल दीक्षित यांची उपस्थिती होती.
नियुक्ती मिळवलेल्या कर्मचाऱ्या मध्ये सेवकराम मोरे, विकास गायकवाड विशाल सोनवणे, रोहित शिरसाट,गायत्री संसारे,उषा कंडारे,आकाश मोरे विद्या आदिवाल,दीपक शेजवळ गीता कंडारे,पल्लवी जाधव, रवींद्रलहासे,सचिन देहडे, रोहित ब्राह्मणे संदीप सोनवणे, दीपक खैरे अशा सोळा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देण्यात आले.
लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुरू असलेल्या केसच्या संदर्भात उच्च न्यायालयानेअनुसूचित जाती प्रवर्गातील सफाई कामगारांना नियुक्ती देण्याबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पाचोरा नगर परिषदेने 16 कर्मचाऱ्यांना नियुक्त पत्र देऊन सेवेत सामावून घेतले.यावेळी प्रवीण ब्राह्मणे यांनी मनोगत व्यक्त करत आमदार किशोर आप्पा पाटील यांचे कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित सोनार यांनी केले.



अनुसूचित जाती प्रवर्गातील बांधवांच्या नियुक्तीच्या पाठपुराव्या यापुढील काळात महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका,महानगरपालिकांमध्ये इतर समाजातील जे कर्मचारी साफसफाईचे काम वर्षानुवर्षे करत आले आहेत. त्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत.
किशोर आप्पा पाटील
आमदार -पाचोरा भडगाव

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!