उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणीबाबत महाविद्यालयांना अचानक भेटी
जळगाव , दि.14 :- उच्च च तंत्र शिक्षण विभागाच्या दि.8 जुलै, 2024 शासनाच्या निर्णयानुसार जळगांव जिल्ह्यातील अशासकीय अनुदानित विनाअनुदानित कायम विना अनुदानीत, कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग (SEBC) तसेच इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क १०० टक्के मंजूर करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी बाबतची तपासणीसाठी सहसंचालक उच्च शिक्षण जळगांव विभागातील तपासणी पथकाने १२ऑगस्ट, २०२४ रोजी महाविदयालयांना अचानक भेटी देऊन कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये सदर प्रवर्गातील पात्र विद्यार्थीनीकडून शिक्षण शुल्क घेतले आहे का? विशाखा समिती नेमली आहे का?, तक्रार निवारण समिती नेमली आहे का ? तक्रार पेटी महाविद्यालयात लावण्यात आलेली आहे का? तसेच स्कॉलरशिप नोडल ऑफीसर नेमण्यात आलेले आहे का? याबाबतच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यापुढेही सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्हयातील अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित कायम विना अनुदानीत. कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना अचानक भेटी देण्यात येणार आहेत. सदर भेटी मध्ये पात्र विद्यार्थीनींकडून शिक्षण शुल्क नियमबाहय घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित महाविद्यालयांवर कडक कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित करण्यात येईल. तरी सर्व महाविदयालये व विद्यापीठ यांनी याची दखल घेण्याबाबत डॉ. रणजितसिंह कृ. निबाळकर, सहसंचालक उच्च शिक्षण जळगांव विभाग, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन केलेले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377