पाचोरा : येथील पाचोरा डॉक्टर असोसिएशन (पी. डी. ए.) ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच स्वामी लॉन्स, भडगाव रोड , पाचोरा येथे संपन्न झाली. संघटनेचे ज्येष्ठ सदस्य डॉ भारत बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी पी.डी.ए. चेअरमन डॉ अनिल झंवर,आय.एम.ए. अध्यक्ष डॉ.जयंत पाटील, माजी पी.डी.ए. अध्यक्ष डॉ. अतुल पाटील, डॉ. दिनेश सोनार, डॉ. नरेश गवांदे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला मागील वर्षाच्या कार्यकारिणीने राबवलेल्या विविध उपक्रमांचे अभिनंदन करण्यात आले.मान्यवरांच्या उपस्थितीत पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन (पी. डी. ए.) ची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. नवीन कार्यकारणीतील सदस्य व त्यांची पदे खालील प्रमाणे.
डॉ. जाकीर देशमुख- (चेअरमन), डॉ. पवनसिंग पाटील (अध्यक्ष), डॉ अजयसिंग परदेशी- (उपाध्यक्ष), डॉ. मुकेश राठोड- (सचिव), डॉ. अमोल जाधव- (खजिनदार), डॉ.संजय जाधव (सहसचिव).
या सर्वसाधारण सभेला पी.डी.ए.सदस्य डॉ. विजय जाधव, डॉ. मुकेश तेली, डॉ. राहुल काटकर, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. कुणाल पाटील, डॉ. हृषिकेश चौधरी, डॉ. विशाल पाटील, डॉ. दीपक चौधरी, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. राहुल पटवारी, डॉ. चारुदत्त खानोरे, डॉ. मुकुंद सावनेरकर, डॉ. अनुप अग्रवाल, डॉ. भूषण शिंदे, डॉ. राहुल झेरवाल, डॉ. जीवन पाटील, डॉ. अविनाश पाटील, डॉ. आलम देशमुख, डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. प्रवीण माळी, डॉ. राहुल पाटील, डॉ. अभिषेक जगताप, डॉ. भूषण महाजन, डॉ. महेन्द्रसिंग बायस, डॉ. किशोर सोनवणे. आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नवीन कार्यकारणी निवडी निमित्त नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी आपला संकल्प जाहीर केला. सभेचे सूत्रसंचालन डॉ. जीवन पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ. हर्षल देव यांनी तर नूतन उपाध्यक्ष डॉ.अजयसिंग परदेशी यांनी आभार प्रकटन केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377