पाचोरा ता.24: मी दहा वर्षात मतदारसंघाचा केलेला विकासावर तुम्ही दाखवलेला विश्वासामुळे आज नामांकन अर्ज भरण्यासाठी आपण केलेली रेकार्डब्रेक गर्दि ही आगामी विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली असून आता पुढच्या टप्प्यात जलसंधारण व रोजगार निर्मितीच्या विषयावर काम करणे माझा मुख्य अंजेडा रहाणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
त्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून पाचोरा-भडगाव मतदारसंघाचा शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, मला मोठ्या विश्वासाने माय बाप जनतेने सलग दोन टर्म निवडुन दिले. तुमचा माझ्यावरचा विश्वास मी सार्थ ठरवित तब्बल 3 हजार कोटीची विकास कामे मतदारसंघात केली. म्हणूनच आज तुम्ही माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी एवढ्या रेकार्डब्रेक संख्येने उपस्थीत आहात. आता मला तुमच्यामुळे विजयाची पुर्णपणे खात्री आहे. आता पुढच्या टप्प्यात मतदार संघातील तरूणांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलध्द व्हावा यासाठी मंजुर असलेल्या एमआयडीसीत मोठे उद्योग आणून रोजगार उपलध्द करून देण्याचे माझे लक्ष असणार आहे. तसेच सूतगिरणीच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती चा आपला प्रयत्न आहे तर गिरणा नदिवर प्रलंबित असलेले बंधाऱ्यांना शासनाकडून निधी आणून ते पुर्ण करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गिरणा पट्टा समृध्द करण्याचा माझा मानस आहे. तर नार-पार-गिरणा नदिजोड प्रकल्पाला चालना देण्याचा विषय माझ्या मुख्य अंजेडावर आहे.
ते पुढे म्हणाले की, ज्याच्या काकांने बाजार समितीत शेतकऱ्यांना मारहाण केली, शेतकऱ्यांच्या हक्काची बाजार समितीची जागा हडपण्याचा प्रयत्न केला ते मला शेतकऱ्यांसाठी काय केले ते विचारता? ज्याचे आयुष्य कमिशनवर गेले ते मला कमिशनवर काय बोलतील. यांना त्यावर बोलण्याची नैतिकता तरी शिल्लक आहे का? अशी टीका करत दिलीप वाघ व अमोल शिंदेचा चांगलाच समाचार घेतला. आमदार मंगेश चव्हाण म्हटले की, किशोर आप्पाची ही अर्ज दाखल करण्याची सभा नसून विजयी सभा आहे. महायुतीचे सर्व मित्र पक्ष हे ताकदीने किशोर आप्पांच्या मागे राहतील. किशोर आप्पांनी मतदारसंघाचा केलेला विकासामुळे त्यांचा विजय होणे हे त्याच्यांपेक्षा तुमची गरज आहे. ते विजयी झाले तरच विकासाला अधिक गती मिळेल. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी ही आमदार किशोर आप्पांची हॅट्रीक पक्की असल्याचे मत मांडले तर शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले यांनी ही प्रखरतेने तोफ डागली. याशिवाय भाजपचे मधुकर काटे यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते महायुती म्हणुन किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीमागे असल्याचे सांगीतले. पीआरपीचे राजू मोरे, चंद्रकांत धनवडे माजी नरगसेवक रविंद्र पाटील यांनी ही भाषणे केली. यावेळी व्यासपीठावर चाळीसगावाचे आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, भडगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विकास पाटील, आरपीआय चे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, शिवसेनेचे प्रवक्ते प्रदिप देसले, पीआरपी चे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, बाजार समीतीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती पी.ए.पाटील, भडगाव शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, पाचोरा माजी नगराध्यक्ष संजय गोहील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, किशोर बारावरक, तालुकाप्रमुख सुनील पाटील, संजय पाटील, युवासेनेचे लखीचंद पाटील, जितेंद्र जैन, आरपीआय चे तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, विनोद अहीरे, शशिकांत येवले, अजय चौधरी, बबलू देवरे, सुमित सावंत, भोला पाटील, माजी नगरसेवक अय्युब बागवान, रफिक बागवान,शाकीर बागवान, डॉ. शांतीलाल तेली, भिल्ल समाज संघटनेचे धर्माभाऊ बाविस्कर, एकनाथ महाजन, आनंद सोपे, विनोद बागुल, मतिन बागवान,डाॅ.भरत पाटील, पंढरीनाथ पाटील, समाधान पाटील, संतोष महाजन, अतुल परदेशी, रविंद्र पाटील, राहुल पाटील, डाॅ. अर्चना पाटील, डाॅ.प्रियंका पाटील, इंदल परदेशी, हिंमत निकम, बंडू चौधरी, देवा अहीरे,सुरेंद्र मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण ब्राम्हणे यांनी केले.
विराट रॅलीने वेधले लक्ष
दरम्यान आमदार किशोर पाटील यांचा अर्ज दाखल करण्याचासाठी मोंढाळा रस्त्यावरील तुळजाई जिनिंग वरून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. सुमार दोन किलोमीटर पेक्षा अधिक अंतराची रॅली होती. किशोर पाटील यांनी बैलगाडीवरून प्रवास करत अर्ज दाखल केला. यावेळी बैलगाडीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण बैलगाडीवर होते. रॅलीत तरूंणासह महीलांची गर्दि लक्षणीय होती.
किशोआप्पांसह महायुती 11 उमेदवार निवडून येतील- मंत्री गिरीश महाजन
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांसह महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना माल्यार्पण केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी याठिकाणी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी म्हटले की, मला अगोदर सहा निवडणुकांचा अनुभव आहे. त्यामुळे मी याठिकाणी पाहत असलेले चित्र किशोर आप्पा पाटील यांच्या हॅट्रीक ची नांदी आहे. ते तर निवडुन येतीलच पण जिल्ह्यातील महायुतीचे सर्व 11 आमदार निवडून येतील याची शंभर टक्के खात्री असल्याचे सांगतीले. महायुती म्हणुन पुर्ण ताकदीनिशी माझ्यासह भाजप पक्ष किशोर पाटील यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव खासदार स्मिता वाघ यांनीही किशोर पाटील यांच्या विजयाची खात्री दिली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377