आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे बालरंग महोत्सव संपन्न

पाचोरा- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे बालरंग महोत्सव 2025 अर्थात चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन हा बहारदार कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासो श्री.संजयजी ओंकार वाघ ,डॉ.राममनोहर लोहिया माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन आण्णासो श्री.दगाजी वाघ ,शाळेचे चेअरमन बापूसो श्री. जगदीशजी सोनार, शाळेचे माजी मुख्यध्यापक श्री.सिताराम पाटील सर, संस्थेचे समन्वयक जिभाऊ सो श्री.एस.डी.पाटील सर ,ज्येष्ठ पत्रकार श्री.शांताराम चौधरी सर,पालक प्रतिनिधी श्री. गजानन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला साळुंखे मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली .म.मुख्याध्यापिका उज्वला साळुंखे मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली.. कार्यक्रमात राजस्थानी, गुजराथी पंजाबी ,खानदेशी ,एज्युकेशन,शेतकरी, साक्षरता, पारंपारिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक, पर्यावरण संतुलन इत्यादी अनेकविध प्रकारच्या थीम या ठिकाणी सादर करण्यात आल्या. तसेच वैयक्तिक नृत्य ,सामुहिक नृत्य, फॅन्सी ड्रेस, यासारख्या अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल पाहण्यास मिळाली .

कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.जयश्री पाटील, श्री संदीप वाघ,श्रीमती.रूपाली साळुंखे व श्री.प्रवीण कोळी सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.दिपक पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!