शासनाने नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करावे यासाठी नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची आ किशोर आप्पा पाटील यांच्याकडे मागणी

भडगाव – पाचोरा भडगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँक तर्फे शेतीसाठी पीक कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची पिक कर्ज माफ करावे या मागणीसाठी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनात सण 2008 साली केंद्राच्या यूपीए सरकारने तसेच सन 2011 साली तत्कालीन सरकारने सुद्धा ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत होते त्यांना कर्ज माफ केले परंतु कोणत्याही सरकारने दरवर्षी नियमित असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही म्हणून सरकारने आता नियमित शेती पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी केली आहे सदर देताना डाव्याकडून साहेब पाटील (पांढरद) दिलीप पाटील (पांढरद) रघुनाथ पाटील (पांढरद) राजेंद्र सोनार (पाचोरा) राजेंद्र भावसार (पाचोरा) वसंत पाटील (पांढरद) भरत पाटील (वाणेगाव) पोलीस पाटील (मळगाव) आदी उपस्थित होते
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



