जिल्ह्यातील सर्व निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च रोजी सुरु राहणार

जळगाव, दिनांक 25 मार्च, 2025 : – महाराष्ट्र मुद्रांक शुल्क संबंधीचे कामकाज तसेच आर्थिक वर्ष 2024-2025 चा इष्टांक पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालये 29 ते 31 मार्च, 2025 या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्याचे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांनी दिले आहे. अशी माहिती जळगावचे मुद्रांक जिल्हाधिकारी, सुनिल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते दरवर्षी 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने मार्च महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे पक्षकार किंवा नागरिकांना दस्त नोंदणीचे अर्ज जमा करणेसाठी शासकीय सुट्टीच्या दिवशी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व जळगाव जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु राहणार आहे.
तरी वरील दिवशी दस्त नोंदणीचा अर्ज जमा करण्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी सुनिल पाटील यांनी केले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



