राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रात रक्तदान शिबिरांचे आयोजन; ३,५०० बाटल्यांचे संकलन

जळगाव, दि.१७ – राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये “सेवा समर्पण दिन” या संकल्पनेतून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण ३,५०० रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले.या उपक्रमामध्ये आरोग्य विभाग, विविध सामाजिक संस्था, रक्तपेढ्या तसेच स्वयंसेवी गटांच्या सहकार्याने जिल्हानिहाय पातळीवर शिबिरे पार पडली. स्थानिक स्तरावरील कार्यकर्ते, युवकवर्ग व नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.जिल्हानिहाय संकलनाचा तपशील पुढीलप्रमाणे – नाशिक शहर – 2,510 बाटल्या, जळगाव शहर व परिसर – 550 बाटल्या, नाशिक ग्रामीण भाग – 170 बाटल्या, जामनेर तालुका – 160 बाटल्या, धुळे जिल्हा – 110 बाटल्या एवढे रक्त संकलन करण्यात आले.
शिबिरांचे आयोजन करताना सुरक्षिततेचे सर्व आवश्यक निकष पाळण्यात आले. रक्तपेढ्यांनी संकलन प्रक्रियेचे योग्य समन्वयन साधले. काही ठिकाणी स्थानिक उद्योग संस्था, सहकारी संस्था व स्वयंसेवी गटांनी आयोजनास सहकार्य केले.रक्तदान मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी संस्था, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



